रक्षा खडसे यांच्याकडून तापी खोरे पुनर्भरण योजनाचा आढावा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा: तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज) संबंधी माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 213706 हेक्टर क्षेत्रास व मध्यप्रदेशातील 96082 हेक्टर पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार आहे. जळगाव जिल्ह्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प “मेगा रिचार्ज” योजनेचा आढावा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला. याबाबत लवकरच दिल्ली येथे बैठक …

रक्षा खडसे यांच्याकडून तापी खोरे पुनर्भरण योजनाचा आढावा

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा: तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज) संबंधी माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 213706 हेक्टर क्षेत्रास व मध्यप्रदेशातील 96082 हेक्टर पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार आहे. जळगाव जिल्ह्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प “मेगा रिचार्ज” योजनेचा आढावा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला. याबाबत लवकरच दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री खडसे यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज) प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे. यासाठी आज (दि.१६) तापी पाटबंधारे अधिकाऱ्यांची मंत्री खडसे यांनी कोथळी येथे बैठक घेतली.
या प्रकल्पातून महाराष्ट्र राज्यातील जळगाव, बुलढाणा, अकोला अमरावती या जिल्ह्यातील 213706 हेक्टर क्षेत्रास तसेच मध्यप्रदेश राज्यातील खंडवा, बऱ्हाणपूर या जिल्ह्यातील 96082 हेक्टर क्षेत्रात पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार आहे.
तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनाचा 19244 कोटी किमतींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांच्या सहमतीसाठी शासनास सादर केला आहे. या बैठकीस तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दाभाडे व उपविभागीय अभियंता के. पी. पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

धुळे: गोताणे येथील ४ तलावांची कामे प्रगतीपथावर; खासदार, आमदारांकडून पाहणी
धुळे : अनिल गोटे यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग
धुळे जिल्ह्यातील सात गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई