भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : टाकळी (भोसा) येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळुन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.16) सायकांळी ही घटना घडली. कचरू नामदेव ढेंगे (वय. 35, रा. टाकळी भोसा) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. शनिवारी ढेंगे हे शेतात काम करत होते. सायंकाळच्या सुमारास अचानक वादळवाऱ्याला सुरुवात झाली. यानंतर काही ठिकाणी जोरदार  विजांच्या कडकडाटासह …

भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : टाकळी (भोसा) येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळुन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.16) सायकांळी ही घटना घडली. कचरू नामदेव ढेंगे (वय. 35, रा. टाकळी भोसा) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
शनिवारी ढेंगे हे शेतात काम करत होते. सायंकाळच्या सुमारास अचानक वादळवाऱ्याला सुरुवात झाली. यानंतर काही ठिकाणी जोरदार  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. या पावसात कचरु ढेंगे याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. परंतु, उपचारादरम्यान ढेंगे यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोकाकुळ पसरलेला आहे.
हेही वाचा :

नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार नवा राजकीय एल्गार
कार्यकर्ते आकडेमोडीत, शेतकरी मशागतीत गर्क; पेरणीपूर्व मशागतीला आला वेग
आंदोलनाशिवाय पाणीच द्यायचे नाही का? शेतकरी आक्रमक