धुळे: गोताणे येथील ४ तलावांची कामे प्रगतीपथावर; खासदार, आमदारांकडून पाहणी
धुळे, Bharat Live News Media वृत्तसेवा: धुळे तालुक्यातील गोताणे येथील मुंजळ्या पाझर तलाव, नकटेखोसे पाझर तलाव, बामणदरा पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. निमदरा पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामांची खासदार शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील यांनी आज (दि.१६) पाहणी केली.
या धरणांच्या पुनर्जीवनाच्या कामांमुळे गोताणेसह, उडाणे, आनंदखेडे येथील शेकडो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. आ.कुणाल पाटील यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नाने गोताणे येथील शेती सुजलाम सुफलाम होवून शेतकर्यांच्या जीवनात सुख समृध्दी येणार आहे.
धुळे तालुक्यातील गोताणे वनक्षेत्रातील शिवारात असलेल्या मुंजळ्या पाझर तलाव, नकटेखोसे पाझर तलाव, बामणदरा पाझर तलाव, आणि निमदरा पाझर तलावांची दुरुस्ती व्हावी, म्हणून आ. कुणाल पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळवून घेतली होती. त्यासाठी चारही पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 6 कोटी 11 लाख मंजूर करण्यात आले होते. या निधीतून मुंजळ्या पाझर तलाव, नकटेखोसे पाझर तलाव, बामणदरा पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. तर निमदरा पाझर तलावांचे काम प्रगतीपथावर आहे.
यावेळी डॉ. दिनेश बच्छाव, जि. प. सदस्य अरुण पाटील, रायबा पाटील, ज्येष्ठ नेते पोपट शिंदे, सरपंच भूषण पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, माजी उपसरपंच वसंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ बाळा पाटील, जिभाऊ डिगंबर पाटील, ज्येष्ठ नेते झुलाल पाटील, दगडू पाटील, पंढरीनाथ पाटील, धुडकू पाटील, राजधर पाटील, उडाणे माजी उपसरपंच विठोबा पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिंदे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा
धुळे जिल्ह्यातील सात गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
धुळे : अनिल गोटे यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग
धुळे : महिन्याभरापूर्वी झालेल्या रस्त्याला पहिल्याच पावसात भले मोठ्ठे भगदाड; शिवसेनेच्यावतीने निदर्शने