प्रकाश शेंडगेंना कधी विरोधक मानले नाही : मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दहा महिन्यात त्यांच्यावर मी बोललो का? त्यांच्यावर कधीच बोलत नाही. त्यांना कधी विरोधक मानलेच नाही. मानल्यावर बघू, ज्याला मानायचे त्याला मानले आहे. असे विधान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या व्यक्तव्याविषयी बोलताना केले आहे. जरांगे यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी …

प्रकाश शेंडगेंना कधी विरोधक मानले नाही : मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : दहा महिन्यात त्यांच्यावर मी बोललो का? त्यांच्यावर कधीच बोलत नाही. त्यांना कधी विरोधक मानलेच नाही. मानल्यावर बघू, ज्याला मानायचे त्याला मानले आहे. असे विधान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या व्यक्तव्याविषयी बोलताना केले आहे.
जरांगे यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी (दि.१६) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले, येत्या १३ तारखेपर्यंत शेंडगेंच्या भूमिकेबाबत मी काहीच बोलणार नाही. भूमिका व्यक्त करणारे ते कोण? मराठा आरक्षणाबाबत भूमिका व्यक्त करणारे सरकार आहे.
यामुळे आमचा वाद सरकारशी आहे. त्यांनी सरकारला बोलले पाहिजे, आम्हाला कशाला बोलताय असे जरांगे म्हणाले. तसेच १३ तारखेपर्यंत कोण काय बोलते याकडे समाजाचे बारकाईने लक्ष आहे. मराठा समाजाच्या एकजुटीने एक गोष्ट झाली ती म्हणजे, गेल्या काही दिवसापासून सर्व पक्षांच्या आजी-माजी लोकप्रतिधी पाठिंब्यासाठी पत्र घेऊन येत आहेत. हा मराठा समाजाला चांगला संदेश जात आहे. मात्र कुठला लोकप्रतिनिधी येत नाही हे देखील समाज बघतोय.
जरांगेंचा लोणीकरांना टोला
भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या ४० वर्ष मराठा मुख्यमंत्री असून आरक्षण दिले नाही, मात्र आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. या व्यक्तव्याबाबत बोलताना जरांगेंनी, लोणीकरांना उपरोधक टोला लगावला. ते म्हणाले, हो दिले ना आरक्षण, दोन अडीच कोटी पोर लागली आमची नोकरीला, १३ तारखेपर्यंत थांबा मग बघू.
माझा,समाजाच्या एकजुटीवर विश्वास!
जरांगे म्हणाले, आंदोलकाच्या भूमिकेत त्याला अपेक्षा तसेच सरकारवर विश्वास ठेवावा लागतो, आणि तो मी ठेवतोय. मात्र माझा विश्वास संघर्षावर आहे, माझ्या चळवळीवर व आणि समाजाच्या एकजुटीवर आहे. यामुळेच आम्हीं आरक्षण खेचून आणणार आहे.