नातूच निघाला कर्दनकाळ! पाेलिसांचा एक संशय आणि खूनाचा छडा लागला

उषा विठ्ठल गायकवाड (सप ६२, रा. म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा) या सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या होत्या. त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. त्यांनी केशावरील म्हसोभानगर येथे जागा घेऊन घर बांधले होते. निवृत झाल्यापासून त्या मुलगा, नातू व मुनेसोबत एकत्र राहात होत्या. त्यांनी मुलाला काही पैसे हातउसने दिले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यावेळी …

नातूच निघाला कर्दनकाळ! पाेलिसांचा एक संशय आणि खूनाचा छडा लागला

अशोक मोराळे, पुणे

उषा विठ्ठल गायकवाड (सप ६२, रा. म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा) या सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या होत्या. त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. त्यांनी केशावरील म्हसोभानगर येथे जागा घेऊन घर बांधले होते. निवृत झाल्यापासून त्या मुलगा, नातू व मुनेसोबत एकत्र राहात होत्या. त्यांनी मुलाला काही पैसे हातउसने दिले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यावेळी उषा या नातू साहिल व त्याचे वडील संदीप यांना घर सोडून जाण्यास सांगत असे. त्यामुळे साहिल हा नेहमीच आजी उषा यांच्यावर चिडून असायचा. आजीबाबत साहिलच्या डोक्यात नेहमी सैतान संचारलेला असायचा. त्याच्या मनात आजीचा कायमचा काटा काढण्याची योजना सुरु होती.
त्यातूनच त्याने एकेदिवशी उषा या घरात झोपलेल्या असताना, दुपारी एक ने सव्वा एक वाजताच्या सुमारास त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी व पोलिसांना गुंगारा देण्यासाठी उषा वापरत असलेला मोबाईल त्याच्या काशेवाडी परिसरात ठेवून दिला. कोणी फोन केला तर उषा फोन उचलत नाहीत, असे वाटावे म्हणून त्याने ही योजना आखली होती. त्यानंतर साहिलने मंगळवार पेठेतून झाडे कापण्याचे इलेक्ट्रीक कटर खरेदी करून आणले. उषा याच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर शांत डोक्याने ते तुकडे दुचाकी व चारचाकी गाडीतून पोत्यात भरून सुरूवातीला केशवनगर येथील जॅकवेल कचरा डेपोच्या बाजूला मुळा-मुठा नदीपात्रात तसेच थेऊर येथील नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात टाकून दिले. त्यानंतर घरी येऊन काही झालेच नाही अशा आविर्भावात इलेक्ट्रीक कटर व रक्ताने भरलेले कपडे मांजरी येधील नदीत फेकून दिले.
दुसरीकडे आईला फोन लागत नव्हता म्हणून उषा यांच्या मुलीने घरी जाऊन पाहिले असता, ती मिळून आली नाही. त्यामुळे तिने मुंढवा पोलिसांत धाव घेत आई बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. एवढेच नाही तर तिच्या जीवाचे बरेवाईट झाल्याची शंकाही तिने व्यक्‍त केली. पोलिसांनी गुन्हाचे गांभीर्य ओळखून महिलेचा नातू साहिल आणि मुलगा संदीप या दोघांना ताब्यात घेतले. याच दरम्यान त्या परिसरात उषा यांच्या नातवानेच म्हातारीचे बरेवाईट केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती; मात्र बाप-लेकांनी दोघांनी आम्हाला काही माहिती नाही, असे सांगून हात वर केले.
आजीच्‍या दोन्ही सुनांकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळविला असता, दोघींनीही साहिलच्या हैवानी कृत्याचा पाढाच वाचला. याचवेळी पोलिसांनी येऊर येथील वाडेगाव मुळा-मुढा नदीच्या कडेला एका व्यक्तीचा पाय मिळून आला होता. त्याबाबत डॉक्टरांनी दिलेला शवविच्छेदन अदवाल आणि डीएनए टेस्टचा रिपोर्ट सकारात्मक मिळून आला. त्यामुळे तो पाय उषा यांचाच असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यामनुसार, साहिल उर्फ गुड्डू संदीप गायकवाड ( वय २०), संदिप विठ्ठल गायकवाड (वय ४०) या दोघा बाप- लेकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली.
साहिलने आजीचा खून करून तुकडे केले तेव्हा घरात कोणी नव्हते. जेव्हा साहिलची आई घरी आली तेव्हा तिने घरातील  दृश्य पाहिले. घरातील फरशीवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडलेले होते. तर बाथरूममध्ये देखील फिनेलचा उग्र वास येत होता. घरातील धान्य फरशीवर ओतलेले होते. त्यावेळी तिने साहिलला विचारले असता तेव्हा त्याने चिकनवाल्याला पोते हवे होते म्हणून दिल्याचे सांगितले.
साहिल याने अतिशय शांत डोक्याने आजीचा खून केला. त्याने हे सर्व करण्यापूर्वी ‘क्राइम पेट्रोल’ मालिका आणि ‘दृश्यम’ चित्रपट अनेकदा पाहिला असल्याचे पोलिस सांगतात. उषा याचा खून केल्यानंतर त्याने शांत डोक्याने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापासून ते पोलिसांना गुगांरा देण्याचे काम केले. उषा यांचे वजन जास्त असल्यामुळे एकाचवेळी त्याचा मृतदेह बाहेर फेकणे अ‍वघड असल्याचे साहिल याच्या लक्षात आले होते. त्यासाठी त्याने इलेक्ट्रीक कटर विकत आणून मृतदेहाचे डोक्यापासून पायापर्यत लहान-लहान तुकडे केले. त्यानंतर पोत्यात भरून वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकून दिले.
आजीला चालता येत नव्‍हतं… पाोलिसांनी सत्य शोधून काढलेच
पोलिसांना गुंगारा देण्यायाठी त्याने मुंढवा पोलिसात वहिलांना सोबत घेउन आजी बेपत्ता असल्याची तक्रार देखील दिली. मात्र, पोलिसांनी जेव्हा घरी जाऊन पाहिले तेव्हा उषा यांची चप्पल आणि काठी बाहेर मिळून आली. उषा यांना पायाचा आजार असल्याने त्यांना चालता येत नव्हते. तेथूनच पोलिसंनी तपासाला गती दिली. पोलिस आपल्या घरच्या लोकांकडे चौकशी करतील म्हणून साहिल याने सुरूवातीपासूनच त्यांना पोलिसांना कशी उत्तरे द्यायची हे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास करून सत्य शोधून काढलेच. मुंढवा पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरिक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस उपनिरिक्षक अविनाश मराठे यांच्या पथकाने या खुनाचा छडा लावला होता.
हेही वाचा 

Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!
Pudhari Crime Diary : ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली
Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी