EVM वरून काँग्रेसचा पुन्हा रडीचा डाव: भाजपचा आरोप
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बद्दल रडीचा डाव काँग्रेसने पुन्हा खेळायला सुरू केला आहे. काही शब्दांची फेरफार आणि माध्यमातील काही HMV हाताशी धरून पुन्हा एकदा ही लबाड लांडग्याची टोळी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्यासाठी तयार झाली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भातील ‘X’ पोस्ट महाराष्ट्र भाजपने (Bjp on EVM) केली आहे.
एक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी “इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक होऊ शकते, ते हटवले पाहिजे” असा खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करत तसेच एका दैनिकातील ईव्हीएम संदर्भातील वृत्ताचा हवाला देत पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’च्या वस्तुनिष्ठतेवर सवाल केले आहेत. त्यामुळे ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपली (Bjp on EVM) जाण्याची शक्यता आहे.
खोटं बोला पण रेटून बोला अशी गत विरोधकांची झाली आहे.
EVM बद्दल रडीचा डाव काँग्रेसने पुन्हा खेळायला सुरू केला आहे काही शब्दांची फेरफार आणि माध्यमातील काही #HMV हाताशी धरून पुन्हा एकदा ही लबाड लांडग्याची टोळी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्यासाठी तयार झाली आहे.
EVM ला अन्य कोणतेही…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 16, 2024
ज्या ईव्हीएमने विरोधकांचे उमेदवार निवडून आणले ते योग्य कसे?- भाजप
भाजपने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “EVM ला अन्य कोणतेही इलेक्ट्रोनिक किंवा इतर उपकरण जोडणे अशक्य आहे. म्हणून त्यात मोबाईलद्वारे गडबड झाली, हे म्हणणे विरोधकांची भ्रमित मानसिकता दर्शविणारे आहे. काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे जेवढे उमेदवार निवडणूक आले. ते देखील EVM ने निवडून आले मग ते योग्य आणि हे अयोग्य कसे?
विरोधकांना जनतेने नाकारल्याने EVM बद्दल अपप्रचार
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने देखील अनेक वेळा EVM बाबत सविस्तर माहिती दिली आहे मात्र जनतेला खोटं सांगून त्यांची दिशाभूल करण्याची विरोधकांची खोड जात नाही. जनतेने पुन्हा एकदा नाकारले हे लक्षात येताच विरोधकांनी EVM बद्दल अपप्रचार सुरू केला आहे, असेही भाजपने म्हटलं आहे.
राहुल गांधी ‘ईव्हीएम’बद्दल नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘भारतातील ईव्हीएम एक “ब्लॅक बॉक्स” आहे . ते कोणालाही तपासण्याची परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीची फसवणूक होते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा:
Elon musk | EVM हॅक होऊ शकते, ते हटवले पाहिजे : मस्क यांचा खळबळजनक दावा
‘हा तर ब्लॅक बॉक्स’ : राहुल गांधींकडून ‘ईव्हीएम’वर पुन्हा सवाल