सलमानला जीवे मारण्याची धमकीप्रकरणी गुन्हा दाखल, एकाला अटक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानला मारण्याचा कट रचल्याबद्दल मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीचे नाव बनवारीलाल गुर्जर (वय २५) असे आहे.
काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. कथित व्हिडिओनंतर सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवत तपासाला गती दिली. राजस्थानमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राजस्थानमधून एकाला अटक
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ५०६ (२), ५०४, ३४ आयपीसीसह आयटी कायदा ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे एक पथक राजस्थानला गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी बनवारीलाल गुर्जर नावाच्या व्यक्तीला राजस्थानमधून अटक केली आहे. आज दुपारी त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे.
सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरण
अभिनेता सलमान खानवर १४ एप्रिल २०२४ रोजी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सलमानच्या मुंबईतील घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करून दोन दुचाकीस्वार पळून गेले होते. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी गुजरातमधून दोन्ही गोळीबारांना अटक केली. नंतर पोलिसांनी या प्रकरणी आणखी एक आरोपी अनुज थापन यालाही अटक केली. मात्र, काही दिवसांनी त्याने तुरुंगात आत्महत्या केली. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, सलमान खान शेवटचा ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसला होता. त्यांचा हा चित्रपट गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. आता सलमान आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. एक आर. मुरगादॉसच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना आणि करीना कपूर खान दिसणार आहेत.
हेही वाचा
Varun Dhawan : ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने वरुणची खास पोस्ट; दाखविली मुलीची पहिली झलक
धोकेबाज…; करण कुंद्रा- तेजस्वी प्रकाशचा ब्रेकअप?
Salman Khan : सलमान खानवर हल्ल्याचा कट; बिष्णोई टोळीतील ४ जणांना अटक