पाटण्यात गंगा नदीत बोट उलटली; ४ जण बेपत्‍ता, बचावकार्य सुरू

पटना : पुढारी ऑनलाईन राजधानी पटना जवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत बोट उलटून अनेक लोक बुडाल्‍याचे समोर आले आहे. या बोटीत जवळपास १७ लोक बसले होते. त्‍यातील १३ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजुन ४ लोक बेपत्‍ता आहेत. गंगा दसऱ्यानिमित्त एका कुटूंबातील १७ जण गंगा स्नान करण्यासाठी एका बोटीने जात होते. …

पाटण्यात गंगा नदीत बोट उलटली; ४ जण बेपत्‍ता, बचावकार्य सुरू

पटना : Bharat Live News Media ऑनलाईन राजधानी पटना जवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत बोट उलटून अनेक लोक बुडाल्‍याचे समोर आले आहे. या बोटीत जवळपास १७ लोक बसले होते. त्‍यातील १३ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजुन ४ लोक बेपत्‍ता आहेत.
गंगा दसऱ्यानिमित्त एका कुटूंबातील १७ जण गंगा स्नान करण्यासाठी एका बोटीने जात होते. या दरम्यान हा अपघात घडला.
या विषयी अधिक माहिती अशी की, बिहारच्या पटना येथे गंगा नदीत बोट उलटल्‍याची घटना समोर आली आहे. गंगा नदीला पूर आलेला आहे. या दरम्‍यान गंगा दसऱ्याचा सण सुरू आहे. त्‍या पार्श्वभूमीवर गंगा स्‍नान आटोपून एकाच कुटुंबातील १७ जण एका बोटीतून गंगा नदी पार करून जात होते. त्‍यावेळी १७ जण बोट उलटल्‍याने पाण्यात पडले. यावेळी स्‍थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्‍क्‍यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. ज्‍यामध्ये जवळपास १३ लोकांना वाचवण्यात यश आले. मात्र ४ लोक अद्यापही बेपत्‍ता आहेत. पटण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमना घटनेची सूचना देण्यात आली आहे. त्‍याचबरोबर घटनास्‍थळी स्‍थानिक प्रशासनाची टीम देखील पोहोचलेली आहे.
या बोटीतील सर्व लोक हे एकाच कुटुंबातील असून नालंदा जिल्‍ह्‍यातील मालती गावचे रहिवासी आहेत. बोट उलटल्‍यानंतर स्‍थानिक नागरिकांनी यातील १३ लोकांना वाचवले. मात्र अजुनही ४ लोक बेपत्‍ता आहेत. बचावकार्य सुरू आहे.
हेही वाचा :

Elon musk | EVM हॅक होऊ शकते, ते हटवले पाहिजे : मस्क यांचा खळबळजनक दावा

‘हा तर ब्लॅक बॉक्स’ : राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केले ‘ईव्हीएम’वर सवाल

Varun Dhawan : ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने वरुणची खास पोस्ट; दाखविली मुलीची पहिली झलक