जम्मूतील दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी मोठा प्लॅन; आज बैठक
Bharat Live News Media ऑनलाईन ; जम्मू भागात नुकतीच घडलेली दहशतवादी घटना आणि अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या अनुशंगाने आज केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असणार आहेत.
सकाळी ११ वाजता नॉर्थ ब्लॉक मध्ये होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, NSA अजित डोभाल, गृह सचिव, IB चीफ, रॉ चीफ, NIA चे DG आर्मी आणि एअरफोर्सचे मोठे अधिकारी यांच्यासह गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.
दहशतवाद संपवण्यासाठी आखली जाणार योजना!
सकाळी ११ वाजता नॉर्थ ब्लॉक मध्ये होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, NSA अजित डोभाल, गृह सचिव, IB चीफ, रॉ चीफ, NIA चे DG सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत आयबी आणि रॉचे प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. एवढेच नाही तर या बैठकीत जम्मू भागात गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू प्रदेशातून दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी एकात्मिक योजना तयार केली जाऊ शकते.
या बैठकीत अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे. अमरनाथ यात्रा कडेकोट बंदोबस्तात पार पडणार असून, आवश्यक सैन्य आणि उपकरणांचा आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून AI आधारित मॉनिटरिंग केले जाईल.
चार दिवसांत 4 दहशतवादी हल्ले
नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये 4 दिवसांत दहशतवाद्यांनी 4 दहशतवादी हल्ले झाले. रियासी, कठुआ आणि डोडा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांकडून जम्मूत शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी कठुआमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :
इंदिरा गांधी मदर ऑफ इंडिया; काँग्रेस नेत्यांबद्दल भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे गौरवोद्गार
NEET 2024 : आक्रमक विद्यार्थ्यांमुळे आंदोलनाला धार
बहार विशेष : दहशतवाद्यांचे लक्ष्य काश्मीर