नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न- रक्षा खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. नाथाभाऊ मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलच आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. केंद्रीय राज्यमंत्री …

नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न- रक्षा खडसे

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. नाथाभाऊ मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलच आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर भुसावळ व मुक्ताईनगर या ठिकाणी जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील तेवढ्या आमच्या पक्षाची ताकद वाढेल.
नाथाभाऊ हे भाजप मधील खूप जुने नेते आहेत, त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे. नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल, गेल्या चार-पाच वर्षापासून मी या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे. परंतु माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे की, या दोघे ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. मागील काळामध्ये जेव्हा या दोन्ही नेते एकत्र होते तेव्हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगले काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. मागील काळात काही नाथाभाऊंच्या आणि काही गिरीश भाऊंच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आहेत. ते विसरून एकत्र येत काम करण्यातची आता चांगली संधी आहे हे आरोप प्रत्यारोप थांबून दोघांनी एकत्र यायला पाहिजे.
कारण गिरीश भाऊ स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जर काम केले तर नक्कीच आपला जिल्ह्याचा खूप चांगला विकास होईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा:

का झाला ‘नीट’चा घोळ?
चिंता नको मोतीबिंदू आणि चष्म्याची