अबब! लोकसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे. कर्नाटक सरकारने शनिवारी (दि.15) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. सरकारच्या निर्णयानंतर कर्नाटकात पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी तर डिझेल 3.05 रुपयांनी वाढवण्यात आले आहे.
इंधनाच्या करवाढीमुळे दरवाढ
कर्नाटक राज्य सरकारच्या सूचनेनुसार, पेट्रोलवर 25.92% कर होता. तो आता वाढून 29.84% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिझेलवर 14.3% इतका कर होता. आता तो वाढवून 18.4% करण्यात आला आहे. या इंधन दराच्या वाढीनंतर बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 85.93 रुपये प्रति लिटर झाला आहे. या इंधनातील दर वाढीनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
Petrol and diesel prices are likely to go up in Karnataka as the state govt revises sales tax by 29.84% and 18.44%.
According to the Petroleum Dealers Association, petrol and diesel prices are likely to go up by Rs 3 and Rs 3.05 approximately in Karnataka pic.twitter.com/rJDinVT6SK
— ANI (@ANI) June 15, 2024
हेही वाचा :
कर्नाटकात खासगी क्षेत्रात १००% आरक्षणाचा प्रस्ताव
Hamare Baarah Movie : कर्नाटक सरकारने घातली ‘हमारे बारह’ चित्रपटावर बंदी; जाणून घ्या कारणे….
गोंदियात भूकंप? नाना पटोलेंनी मध्यरात्री घेतली भाजपच्या माजी आमदाराची भेट