नीटप्रकरणी शिक्षणमंत्र्यांकडून एनटीएची पाठराखण : प्रियंका चतुर्वेदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेतील गोंधळाची चौकशी करण्याऐवजी केंद्रीय शिक्षण मंत्री एनटीएची पाठराखण करीत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मिडीयावरील एक्सवर केलेल्या पोस्टमधून केली आहे. पेपरफुटीचा कुठलाही पुरावा सापडला नसून एनटीए ही विश्वासार्ह संस्था असल्याचा दावा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रियंका चतुर्वेदी …

नीटप्रकरणी शिक्षणमंत्र्यांकडून एनटीएची पाठराखण : प्रियंका चतुर्वेदी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : नीट परीक्षेतील गोंधळाची चौकशी करण्याऐवजी केंद्रीय शिक्षण मंत्री एनटीएची पाठराखण करीत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मिडीयावरील एक्सवर केलेल्या पोस्टमधून केली आहे.
पेपरफुटीचा कुठलाही पुरावा सापडला नसून एनटीए ही विश्वासार्ह संस्था असल्याचा दावा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रियंका चतुर्वेदी यांनी बिहार पोलीस पेपर फुटीचा तपास करीत असताना शिक्षणमंत्री एनटीएचा बचाव करण्यात व्यस्त असल्याचे म्हटले आहे. पेपर फुटीप्रकरणी ३० ते ५० लाखांचे शुल्क आकारणाऱ्या दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. झारखंडच्या टोळीचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय आहे, याकडे चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले आहे.