बीड : लाडेवडगाव येथे परप्रांतीय कुटुंबासह लहान मुलांचा छळ; चौघांविरुद्ध गुन्हा
गौतम बचुटे
केज (बीड): केज तालुक्यात मजुरी करणाऱ्या दोन परप्रांतीय कुटुंबाला मारहाण मारहाण करून त्यांची आणि त्यांच्या लहान मुलांकडून जबरदस्तीने काम छळवणूक केल्याप्रकरणी चौघा विरुद्ध ॲट्रॉसिटीसह बालकामगार कायद्या प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे मागील तीन वर्षापासून मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील झिरपांजरिया (ता. नेपानगर) येथील भिलाला या अनुसूचित जमातीचे छगनलाल मोरे, त्यांची पत्नी रालीबाई, मुलगी रंजना आणि त्यांची विवाहित बहीण पानु जमरे, तिचा नवरा गोपाल जमरे व भारती, राहुल, काजल, विशाल ही चार मुले असे दोन कुटंबे ही लाडेवडगाव ता केज येथील महादेव लाड यांच्या शेतात राहतात.
परप्रांतीय कुटुंबाकडून जबरदस्तीने कमी पैशात काम
एक महिन्या पूर्वी अशोक लाड याने छगनलाल मोरे यांची लहान मुलगी सपना हिला मारहाण केल्याने त्यांनी सपना हिचे लग्न करायचे असल्याचा बहाणा करून तिला छगनलालचा मुलगा अर्जुन सोबत मध्यप्रदेशातील त्यांच्या गावी पाठवून दिले होते. अशोक लाड व महादेव लाड हे त्या परप्रांतीय कडून जबरदस्तीने कमी पैशात काम करून घेत असल्याने त्या मजूर कुटुंबाला तेथे राहायचे नव्हते. तसेच लाड हे ते त्या परप्रांतीय मजुरांना दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवून त्यांना मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातील अर्धे पैसे ते स्वतः घेत असत. त्या परप्रांतीय कुटुंबांना त्यांच्या मध्यप्रदेशातील मूळ गावी जायचे असल्याने मागील एक महिन्या पासून ते महादेव लाड आणि त्यांचा मुलगा अशोक महादेव लाड यांना विनंती करत होते. परंतु ते त्यांना गावी जावू देत नव्हते. लाड हे त्यांच्या कडून जबरदस्तीने काम करून घेत होते.
मुलगा करण याच्याकडून रात्री-अपरात्री शेतातील कामे
तसेच ते त्या परप्रांतीय कुटुंबांना वर्षातील सहा महिने कर्नाटक राज्यात उस तोडण्यासाठी घेउन जात होते. उरलेले सहा महिने लाडेवडगाव येथे काम करून घेत होते. ते कर्नाटक राज्यात उस तोडण्यासाठी गेले असताना छगनलाल याचा लहान मुलगा करण वय (१२ वर्षे) याला अशोक लाड याने लाडेवडगाव येथेच ठेऊन घेतले होते. ते लहान मुलगा करण याच्या कडून रात्री-अपरात्री शेतातील काम करून घेत होते. तसेच लहान मुलगी रंजना हिलाही म्हशीला पाणी पाजायला लावण्या सारखी कामे करून घेत असत. त्यावेळी रंजना मुलगी ही म्हशीवरून पडून तिचे हाताला दुखापत झाली होती. लाड कुटुंबीय हे त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत होते. त्यामुळे ते लाडेवडगाव येथून पळून जाण्याचे प्रयत्नात होते.
कुटुंबाला काठी, लोखंडी सळई व लाथा बुक्क्यांनी मारहाण
शनिवार (दि. ८) दुपारी २ च्या सुमारास छगनलाल मोरे, त्यांची पत्नी रालीबाई, मुलगी रंजना आणि त्यांची विवाहित बहीण पानु जमरे, तिचा नवरा गोपाल जमरे व भारती, राहुल, काजल, विशाल हे टेम्पोने आडस येथील बाजारात गेले असता अशोक लाड यांना संशय आल्याने ती त्यांच्या आला आणि त्याने छगनलाल याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अशोक लाड हा त्या सर्वांना घेऊन लाडेवडगाव येथे आला. गावात आल्यानंतर अशोक महादेव लाड, महादेव लाड, अशोकची पत्नी दीपा लाड, अशोकची आई मीना लाड यांनी त्यांना काठी, लोखंडी सळई व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या मारहाणीत गोपाल हा जखमी झाला म्हणून त्याला दि. ९ जून रोजी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात नेऊन उपचार देखील केला.
दरम्यान शुक्रवारी (दि. १४) छगनलाल यांच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अशोक महादेव लाड, महादेव लाड, दीपा लाड आणि मीना लाड यांच्या विरुध्द ॲट्रॉसिटी आणि बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घटनेला अशी फुटली वाचा :
छगनलालचा चुलतभाऊ मुकेश याने सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्याशी संपर्क साधला. या सर्व अन्याय अत्याचाराची माहिती मिळताच सत्यभामा सौंदरमल, राधाबाई सुरवसे, नारायण डावरे यांनी लाडेवडगाव येथे जावून त्या परप्रांतीय कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्या कुटुंबाला घेवून त्यांनी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांना भेटून हा अन्यायाचा पाढा वाचला.
हेही वाचा
बीड: पिंपरी घाटात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह
बीड : खासदार सोनवणेंची अचानक जिल्हा रूग्णालयाला भेट; शल्यचिकित्सक गैरहजर
Uttarakhand accident| रुद्रप्रयाग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान फंडातून मदत जाहीर