बीड: पिंपरी घाटात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

आष्टी; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पिंपरी घाटा शिवारातील घाटामध्ये एका महिलेचा मृतदेह आज (दि.१५) सकाळी ११च्या दरम्यान एका प्रवाशाला आढळून आला. त्याने म्हसोबावाडीतील गावकऱ्यांना फोन करुन हा प्रकार सांगितला. त्यानंतर अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सुलेमान देवळा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आला. मृत महिलाच्या उजव्या हाताच्या कोपरापुढे …

बीड: पिंपरी घाटात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

आष्टी; Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील पिंपरी घाटा शिवारातील घाटामध्ये एका महिलेचा मृतदेह आज (दि.१५) सकाळी ११च्या दरम्यान एका प्रवाशाला आढळून आला. त्याने म्हसोबावाडीतील गावकऱ्यांना फोन करुन हा प्रकार सांगितला. त्यानंतर अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सुलेमान देवळा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
मृत महिलाच्या उजव्या हाताच्या कोपरापुढे गोंधलेले आहे, उजव्या हाताचे करंगळी जवळील बोट आखुड आहे, डाव्या हातात लाल-सफेद रंगाची कचकडीची एक बांगडी आहे, डाव्या हाताच्या करंगळी जवळील बोटात एक सफेद धातूची अंगठी आहे, नाकात बारीक मुरनी, डोक्याचे केस सफेद, काळे मध्यम लांब, अंगात गुलाबी रंगाचा व त्यावर आकाशी पिवळे रंगाचे फुले असलेला गाऊन, तसेच पिवळ्या रंगाचा परकर परिधान केलेला आहे. या वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास अंभोरा पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन मंगेश साळवे यांनी केले आहे.
हेही वाचा 

बीड : खासदार सोनवणेंची अचानक जिल्‍हा रूग्‍णालयाला भेट; शल्‍यचिकित्‍सक गैरहजर
बीड : गेवराई शहरातील टीएमसी परिसरात आढळला मृतदेह!
बीड : पक्षाच्या बॅनरवर जरांगेंचा फोटो; चर्चेला उधाण