भारत सासणे, देविदास साैदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला यंदाचा बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तुळजापूर येथील देविदास सौदागार यांच्या ‘उसवण’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आज शनिवारी (दि.१५ जून) विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा केली. (Sahitya Akademi Award 2024)
यंदा जाहीर झालेल्या साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये असामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्ऩड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतील लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. संसकृत भाषेतील पुरस्कारांची घोषणा नंतर केली जाणार आहे, असेही अकादमीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उम्रीकर यांच्या परीक्षक समितीने मराठी भाषेतील युवा पुरस्काराच्या साहित्यकृतीची निवड केली आहे.
In Marathi Samsher Aani Bhootbangala (Novel) by Bharat Sasane has been selected for #SahityaAkademi Bal Sahitya Puraskar 2024@ksraosahitya @PIB_India @PIBCulture @MIB_India @DDNational @_IndianCulture
— Sahitya Akademi (@sahityaakademi) June 15, 2024
#साहित्यअकादेमी द्वारा देवीदास सौदागर की कृति उसवण (उपन्यास) को मराठी भाषा में साहित्य अकादेमी युवा पुरस्कार 2024 के लिए चयनित किया गया।@rashtrapatibhvn @PMOIndia @gssjodhpur @Rao_InderjitS @MinOfCultureGoI @secycultureGOI pic.twitter.com/vd0aKY4rug
— Sahitya Akademi (@sahityaakademi) June 15, 2024