नागपूर: चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटातील आणखी एका तरुणीचा मृत्यू

नागपूर: चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटातील आणखी एका तरुणीचा मृत्यू

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील अमरावती रोडवरील धामणा येथील चामुंडा एक्सप्लोसिव्ह या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला होता. आज (दि.१५) आणखी एका गंभीर तरुणीचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या 8 वर गेली आहे. घटनेच्या दिवशी सहा जणांचा तर गेल्या दोन दिवसात गंभीर जखमीचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या 8 वर पोहचली आहे.
रविनगरातील डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये असलेल्या श्रद्धा पाटील (वय 22) या तरुणीचा आज तर दानसा मरसकोल्हे वय 26 वर्षे या तरुणाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. मृतांमध्ये स्थानिक, नजीकच्या गावातील तरुणींचा समावेश आहे. या कारखान्यात झालेल्या स्फोटात प्रांजली मोदरे (वय 22), प्राची फलके (वय 20) , वैशाली क्षीरसागर (वय 20), शितल चटप (वय 30), दानसा मरसकोल्हे (वय 26), मोनाली अलोणे (वय 27), श्रद्धा पाटील (वय 22), प्रमोद चवारे (वय 25) पन्नालाल बंदेवार (वय 50) अशी गंभीर जखमींची नावे असून यातील प्रांजली, प्राची, वैशाली मोनाली आणि पन्नालाल अशा पाच जणांचा गंभीरित्या जळाल्याने  रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.
.यानंतर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीजवळ असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत यापूर्वी अशीच भीषण स्फोटाची घटना घडली होती.
हेही वाचा 

नागपूर: चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटप्रकरणी दोघांना अटक
नागपूर : चामुंडा एक्सप्लोसिव्हमध्ये स्फोट, 5 जणांचा मृत्यू, पाच गंभीर
नागपूरात स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर विरोधात आंदोलन; फडणवीसांच्या घरासमोर सुरक्षेत वाढ