नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : शासकीय ठेकेदाराकडून एक लाख ४ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास ‘लाचलुचपत’ ने रंगेहाथ अटक केली. ठेकेदाराने केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. आज (दि.३०) सापळा रचून लाचलुचपत विभागाने वाढोली येथील या ग्रामसेवकास ताब्यात घेतले. अनिलकुमार मनोहर सुपे असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस … The post नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात appeared first on पुढारी.
#image_title
नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात


नाशिक; पुढारी वृत्तसेवा : शासकीय ठेकेदाराकडून एक लाख ४ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास ‘लाचलुचपत’ ने रंगेहाथ अटक केली. ठेकेदाराने केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. आज (दि.३०) सापळा रचून लाचलुचपत विभागाने वाढोली येथील या ग्रामसेवकास ताब्यात घेतले. अनिलकुमार मनोहर सुपे असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदाराने केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात तसेच सर्व देयकांचे ऑडिट करण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक सुपे याने ठेकेदाराकडे एक लाख चार हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर ठेकेदाराने ‘लाचलुचपत’ विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. व लाचेची रक्कम स्विकारताना ग्रामसेवक सुपे याला  गुरूवारी (दि.३०) संध्याकाळी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निलिमा डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, प्रभाकर गवळी, सुरेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा : 

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील भाजप नेत्याला व्हाट्सअ‍ॅपवर धमकीचे मेसेज, पाच लाखांच्या खंडणीची मागणी
सांगली : डफळापूर येथे कॅनॉलचा भरावा फोडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी सुरक्षित उभी करून सोडले प्राण

The post नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात appeared first on पुढारी.

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : शासकीय ठेकेदाराकडून एक लाख ४ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास ‘लाचलुचपत’ ने रंगेहाथ अटक केली. ठेकेदाराने केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. आज (दि.३०) सापळा रचून लाचलुचपत विभागाने वाढोली येथील या ग्रामसेवकास ताब्यात घेतले. अनिलकुमार मनोहर सुपे असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस …

The post नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Go to Source