रामलल्ला दर्शनासाठी संघाची घरोघरी निमंत्रणाची मोहीम

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात रामलल्लाच्या दर्शनासाठी मोहिमेची आखणी केली आहे. याअंतर्गत नव्या वर्षात 1 ते 15 जानेवारी या कालावधीत संघाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन लोकांना दर्शनासाठी आवाहन करणार आहेत. राम मंदिराचे चित्र आणि अक्षता देऊन हे निमंत्रण दिले जाणार … The post रामलल्ला दर्शनासाठी संघाची घरोघरी निमंत्रणाची मोहीम appeared first on पुढारी.
#image_title

रामलल्ला दर्शनासाठी संघाची घरोघरी निमंत्रणाची मोहीम

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात रामलल्लाच्या दर्शनासाठी मोहिमेची आखणी केली आहे. याअंतर्गत नव्या वर्षात 1 ते 15 जानेवारी या कालावधीत संघाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन लोकांना दर्शनासाठी आवाहन करणार आहेत. राम मंदिराचे चित्र आणि अक्षता देऊन हे निमंत्रण दिले जाणार असल्याचे कळते. (Ayodhya Ram Mandir)
लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही आठवडे आधी (जानेवारीमध्ये) अयोध्येतील भव्य राममंदिराचे लोकार्पण होणार असून रामल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, यासाठी देशभरात शोभायात्रा काढण्यात येणार असून देशातील सर्व जनतेला दर्शन घेण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेच्या दिवशी जगभरातील प्रमुख पाहुण्यांना देखील निमंत्रण दिले जाणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणार्‍या या सोहळ्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपतर्फे देखील देशभरात तालुका ते जिल्हापातळीवर मोहीम राबवणार आहे. यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संलग्न संलग्न संघटनांचे पदाधिकार्‍यांकडून देखील प्रांतनिहाय प्रमुख व्यक्तींना 27 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत अयोध्येला नेण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी, गावोगावी जाऊन लोकांना दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. (Ayodhya Ram Mandir)
10 हजारांहून मान्यवर
22 जानेवारी रोजी होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 10 हजारांहून अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व राज्यातील विविध पंथातील 5000 हून अधिक संतांचा समावेश आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही वाचा : 

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेत होणार आणखी वाढ
Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरात पुजाऱ्यांच्या २० जागांसाठी तब्बल ‘इतके’ अर्ज

The post रामलल्ला दर्शनासाठी संघाची घरोघरी निमंत्रणाची मोहीम appeared first on पुढारी.

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात रामलल्लाच्या दर्शनासाठी मोहिमेची आखणी केली आहे. याअंतर्गत नव्या वर्षात 1 ते 15 जानेवारी या कालावधीत संघाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन लोकांना दर्शनासाठी आवाहन करणार आहेत. राम मंदिराचे चित्र आणि अक्षता देऊन हे निमंत्रण दिले जाणार …

The post रामलल्ला दर्शनासाठी संघाची घरोघरी निमंत्रणाची मोहीम appeared first on पुढारी.

Go to Source