मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चिपळूण संगमेश्वर दरम्यान आरवली रोडनजीक बिघडले. यामुळे मडगावकडे जाणारी ही सुपरफास्ट गाडी पर्यायी इंजिन उपलब्ध होईपर्यंत आरवली येथे जवळपास सव्वादोन तास थांबवून ठेवण्यात आले. याचवेळी मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला.
मुंबईहून गोव्यात मडगावला जाण्यासाठी निघालेली गाडी क्र. १२०५१ ही सुपरफास्ट गाडी नजीक आली असता गाडीचे इंजिन बिघडले. चिपळूण येथून ही गाडी 10 वाजून दोन मिनिटांनी तिच्या पुढील निर्धारित थांबा असलेल्या रत्नागिरीच्या दिशेने रवाना होते. मात्र आज (शुक्रवार) ही गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सावर्डे स्थानकापर्यंत 40 मिनिटे विलंबाने धावत होती. पुढे आरवली नजीक तिचे इंजिन खराब झाल्याने दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ती आरवली येथे उभी होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्यायी इंजिन जोडून ही गाडी पुढील प्रवासासाठी मडगावच्या दिशेने मार्गस्थ केली जाणार आहे.
हेही वाचा :
Adhar Card : मोठी बातमी! आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
बंदी ऐवजी वक्फ बोर्डला 10 कोटी; विहिंपचा महायुती सरकारवर निशाणा
‘ट्री मॅन ऑफ हरियाणा’…एका पोलीसमामाची गोष्ट