बंदी ऐवजी वक्फ बोर्डला 10 कोटी; विहिंपचा महायुती सरकारवर निशाणा
नागपूर Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघपाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदेनेही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदुत्ववादी भाजप-शिवसेना सरकारने वक्फ बोर्डला 10 कोटी रुपयांचा निधी का द्यावा, असा सवाल केला जात आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच मणिपूर प्रश्न, सहमतीच्या राजकारणावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते.
अशी कोणती मजबुरी झाली…
मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटलं आहे की, आजपर्यंत राज्यात तसेच देशातल्या विभिन्न भागात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा कधीही या समाजाने साधा निषेध सुद्धा केला नाही, पीफआय सारख्या देशविघातक संघटनांचाही विरोध या समाजाने कधी केला नाही. पाकिस्तानला दहशतवादी गतीविधीकरीता कधी ठणकावले का? अशी कोणती मजबुरी झाली की एवढ्या तातडीने शासनाने वक्फ बोर्डाला हा निधी मंजूर केला, असा प्रश्नही शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. एवढेच करून सरकार थांबले नसून 10 कोटी पैकी 2 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करूनदिला असल्याने महाराष्ट्रात वक्फ बोर्डवर बंदी आणण्याऐवजी केवळ लांगुलचालन करण्याचे हे कृत्य असल्याचे शेंडे यांनी तोफ डागली.
हेही वाचा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यावर बांधली झोपडी; वैयक्तिक वादातून गावाला धरले वेठीस
खून का बदला खून की, रील्सची खुन्नस?