वीरेंद्र सेहवाग कोण आहे? बांगलादेशचा माजी कर्णधार असं का म्‍हणाला?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत बांगला देश संघाला चांगलाच सूर गवसला आहे. नेदरलँडविरुद्धच्‍या सामना जिंकत संघाने ‘सुपर-8’मध्‍ये जाण्‍याचा आपली अशा कायम ठेवली आहे. या सामन्‍यात संघातील सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार शाकिब अल हसन याने अर्धशतकी खेळी केली. या विजयानंतर त्‍याने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागवर अप्रत्‍यक्ष टीका केली. शाकिबने तब्‍बल ८ वर्षानंतर …

वीरेंद्र सेहवाग कोण आहे? बांगलादेशचा माजी कर्णधार असं का म्‍हणाला?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत बांगला देश संघाला चांगलाच सूर गवसला आहे. नेदरलँडविरुद्धच्‍या सामना जिंकत संघाने ‘सुपर-8’मध्‍ये जाण्‍याचा आपली अशा कायम ठेवली आहे. या सामन्‍यात संघातील सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार शाकिब अल हसन याने अर्धशतकी खेळी केली. या विजयानंतर त्‍याने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागवर अप्रत्‍यक्ष टीका केली.
शाकिबने तब्‍बल ८ वर्षानंतर झळकावले टी-२० विश्‍वचषकात अर्धशतक
गुरुवार, १३ जून रोजी नेदरलँडविरुद्धच्‍या सामन्‍यात बांगला देशचा अष्‍टपैलू खेळाडू शकीब अल हसन हा फॉर्ममध्‍ये परतला. त्‍याने ४६ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावांची खेळी केली. शाकिबने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. शाकिबने ८ वर्षांनंतर टी-20 विश्वचषकात अर्धशतक झळकावले. सामन्‍यानंतर पत्रकार परिषदेत त्‍याने भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला.
काय म्‍हणाला होता वीरेंद्र सेहवाग?
‘क्रिकबझ’बरोबर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्‍हणाला होता की, “मागील विश्वचषक स्‍पर्धेवेळी मला असे वाटले होते की, शाकिबची टी-20 फॉरमॅटमध्ये निवड होऊ नये. त्यांची निवृत्तीची वेळ फार पूर्वीच आली होती. तो वरिष्ठ आहे. तो संघाचा कर्णधारही होता. भूतकाळातील काही आकडेवारी पाहता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही पुढे या आणि घोषणा करा की खूप झाले, मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे.”
शाकिबने केले सेहवागच्‍या टीकेकडे दुर्लक्ष
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिब अल हसनने वीरेंद्र सेहवागला प्रत्‍युत्तर दिले. सेहवागच्या वक्तव्यावर शाकिबला प्रतिक्रिया विचारली असता “कोण आहे सेहवाग?”, असा सवाल करत त्‍याने आपण सेहवागच्‍या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्‍याचे अप्रत्‍यक्षरित्‍या स्‍पष्‍ट केले. शाकिबच्‍या हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : 

ICC Men’s T20 World Cup : अफगाणची दिमाखात ‘सुपर-8’मध्‍ये एन्‍ट्री, न्‍यूझीलंड ‘आऊट’
T20 World Cup : भारत-पाक सामन्याचे ऐतिहासिक स्टेडियम जमीनदोस्त, कारण..