Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पोलीस म्हटलं की, आपल्या डाेळ्यासमाेर खाकी वर्दी आणि चोरी, हाणामारी आणि खून याचा तपास करणारे कर्मचारी हेच येते. पोलिसांचा आणि पर्यावरणाचा दुरायन्वये संबंध नसल्याचेही गृहीत धरले जाते; पण हरियाणामधील पोलीस कर्मचारी देवेंद्र सुरा यांनी हा समज खाेटा ठरवला आहे. त्यांनी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्चून हजाराे झाडे जगवली आहेत. त्यामुळेच ‘ट्री मॅन ऑफ हरियाणा’ अशी त्यांची नवी ओळख झाली आहे.
देवेंद्र सुरा हे हरियाणा राज्यातील सोनीपत येथील आहेत. त्यांनी आपला जिल्हा झाडे लावून हिरवागार केला आहे. आपला जिल्हा हिरवागार व्हावा, यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यांचा वृक्ष संवर्धनाचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कृतीने आता लोकचळवळीचे रुप घेतले आहे.
‘ट्री मॅन’ म्हणून ओळख
देवेंद्र सुरा यांनी सोनीपतमध्ये लाखो झाडे लावली आहेत. देवेंद्र यांनी झाडे लावायला सुरुवात केली यापाठीमागे एक घटना आहे. देवेंद्र हे काही वर्षांपूर्वी चंदीगड येथे कार्यरत असताना शहराच्या सौंदर्याने ते भारावून गेले. आपलंही गाव असेच हिरवेगार असावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले. तेथून त्यांनी २०१२ मध्ये आपल्या गावात झाडे लावायला सुरुवात केली. आला सोनीपत जिल्ह्यात १५२ हून अधिक ग्रामपंयायती आहेत. देवेंद्र सुरा यांनी २०१२ मध्ये सुरु केलेल्या वृक्षाराेपन कार्यक्रमाला आता चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
३० लाखांहून अधिक खर्च झाडांसाठी
देवेंद्र सांगतात, सुरुवातीला मी झाडे लावायला सुरुवात केली. येणारा खर्च हा माझ्या पगारातून होत होता. आतापर्यंत झाडांसाठी ३० लाखांहून अधिक खर्च झाला आहे. सुरुवातीला त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या या उपक्रमाला विरोध केला कारण त्यांना त्यांच्या पगाराचा बराचसा भाग त्यावर खर्च करावा लागत होता; पण जेव्हा लोक त्याच्या कामाला ओळखू लागले आणि त्यांचे कौतुक करू लागले तेव्हा त्यांची नाराजी दुर झाली.
२०१२ पासून झाडे लावायला सुरुवात
‘एएनआय’शी बोलताना पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र सुरा यांनी सांगितले की, “मी २०१२ मध्ये हरियाणाच्या सोनीपत येथून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली. मला विश्वास आहे की जर एखाद्या शहराला एका चळवळीमुुळे हिरवे बनवता आले, तर संपूर्ण देशाला एका चळवळीने हरित करता येईल.”
#WATCH | Chandigarh: A police constable popularly known as the ‘Tree man of Haryana’, Devender Sura, has planted lakhs of trees in Sonipat, Haryana. pic.twitter.com/8IMvp7xRHx
— ANI (@ANI) June 14, 2024
#WATCH | Chandigarh: Tree man of Haryana, police constable Devender Sura says, “…I believe that if a city can be made green with a plan, then the whole nation can be made green with a plan… With this inspiration, I started the plantation drive from Sonipat, Haryana… I… https://t.co/WkNeHQZYDy pic.twitter.com/zj6eqeQMcX
— ANI (@ANI) June 14, 2024
हेही वाचा
जागतिक पर्यावरण दिन : फाशीचा डोंगर ते जैवविविधता वन व्हाया ‘देवराई’; घनदाट वृक्षांनी तापमानात घट
पर्यावरणाबाबत पुन्हा ये रे माझ्या मागल्या!
पर्यावरण : सावलीदार झाडे गेली कुठे?