मी पराभवाचे चिंतन करत नाही: अजित पवार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मी पराभवाचे चिंतन करत नाही. आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझरबद्दल मला काहीही बोलायचे नाही. याबाबत मला काहीही माहिती नाही. सर्वांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. राज्यसभेचा अर्ज दाखल करताना महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना बोलावले नव्हते. त्यामुळे ते आले नाहीत. असे सांगून मंत्री छगन भुजबळ यांनीच आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे, असे स्पष्ट करून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१४) खंडन केले.
पंढरपूर आषाढी सोहळा वारीच्या नियोजनाचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी ११ वाजता पुण्यात घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझरबद्दल अजित पवार काय म्हणाले?
ऑर्गनायझरबद्दल मला काहीही बोलायचे नाही.
सर्वांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.
मी पराभवाचे चिंतन करत नाही
आषाढी वारीबाबत वारकऱ्यांच्या सुचना स्वीकारल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहुतून तुकाराम महाराजांची पालखी निघणार आहे. याबाबतच्या नियोजनाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी वारकऱ्यांच्या सुचना स्वीकारल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरक्षितता, स्वच्छता, रूग्णवाहिका, अग्निशमन दल, आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेच्या वतीने सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. याची त्यांनी तयारी केली आहे. पालखी मार्गावरील कामासाठी निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या स्तरावर आज वारीच्य़ा नियोजनासाठी बैठक घेणार आहेत. यावेळी वारी संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संपूर्ण नियोजन झाले आहे.
भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या महिन्यात किंवा जुलै महिन्यात स्मारकाच्या कामाला सुरूवात होणार आहे. याबाबत पुणे आयक्तांशी चर्चा झाली असून प्लॅनही फायनल झाला आहे. स्मारका ठिकाणी मुलींसाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित केली आहे. त्याचेही काम लवकर सुरू करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाचे डिझाईन सादर करण्यात आले आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करून फायनल केलेल्या प्लॅननुसार काम करण्यात येईल.
कांदा प्रश्नावर ते म्हणाले की, याचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला आहे. ग्राहक आणि उत्पादकांना फायदा होईल, असा निर्णय होणे आवश्यक आहे. याबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
हेही वाचा
New Delhi : अजित पवार गटाला राज्यसभेसह दोन विधान परिषदेच्या जागा मिळणार
अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा अरुणाचलमध्ये डंका; जिंकल्या ३ जागा