छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील भाजप नेत्याला व्हाट्सअॅपवर धमकीचे मेसेज, पाच लाखांच्या खंडणीची मागणी
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्हाटस्अॅप कॉलवर धमकी देत एकाने भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेशमंत्र्यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. हर्सूल परिरसरातील यासीननगर मधील या प्रकरणाची हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्सूल पोलीस ठाण्यात याप्रकरणाची फिर्यादीने तक्रार दिली आहे. वसीम नजिरोद्दीन शेख (३५ वर्षे, रा. यासीननगर) असे फिर्यादींचे नाव आहे. ते भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशमंत्री आहेत. ३ ऑक्टोबर रोजी त्यांना एका क्रमांकावरुन व्हाटस्अॅप कॉल आला. त्यांना अज्ञात व्यक्तीने पाच लाखांची खंडणी मागितली. अज्ञात वांरवार कॉल करत होती. तक्रार देऊनही पुन्हा २६ नोव्हेंबर रोजी मेसेज आला आणि एका कंपनीच्या वॉलेट आयडीवर १०० डॉलर जमा करण्यास सांगितले. तसेच, आणखी एक खाते क्रमांक देत त्यावर पाच लाख रुपये जमा करण्याची धमकी आरोपीने दिली. या सर्व प्रकरणानंतर त्यामुळे वसीम यांनी अनोळखी क्रमांकाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.
The post छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील भाजप नेत्याला व्हाट्सअॅपवर धमकीचे मेसेज, पाच लाखांच्या खंडणीची मागणी appeared first on पुढारी.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्हाटस्अॅप कॉलवर धमकी देत एकाने भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेशमंत्र्यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. हर्सूल परिरसरातील यासीननगर मधील या प्रकरणाची हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हर्सूल पोलीस ठाण्यात याप्रकरणाची फिर्यादीने तक्रार दिली आहे. वसीम नजिरोद्दीन शेख (३५ वर्षे, रा. यासीननगर) असे फिर्यादींचे नाव आहे. ते …
The post छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील भाजप नेत्याला व्हाट्सअॅपवर धमकीचे मेसेज, पाच लाखांच्या खंडणीची मागणी appeared first on पुढारी.