‘आरएसएस’ नेते इंद्रेश कुमारांनी उडवली भाजपची खिल्‍ली,”अहंकारींना प्रभू रामाने…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत ४०० पार घोषणा करणार्‍या भाजपच्‍या पदरी मोठी निराशा पडली. पक्षाला केवळ २४१ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप प्रणित एनडीए सरकारला बहुमत मिळाले मात्र भाजपला अपेक्षित कामगिरी करण्‍यात अपयश आले. यावर पक्षात मंथन सुरु असतानच भाजपची मातृसंस्‍था असणार्‍या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपची खिल्‍ली …
‘आरएसएस’ नेते इंद्रेश कुमारांनी उडवली भाजपची खिल्‍ली,”अहंकारींना प्रभू रामाने…”


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत ४०० पार घोषणा करणार्‍या भाजपच्‍या पदरी मोठी निराशा पडली. पक्षाला केवळ २४१ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप प्रणित एनडीए सरकारला बहुमत मिळाले मात्र भाजपला अपेक्षित कामगिरी करण्‍यात अपयश आले. यावर पक्षात मंथन सुरु असतानच भाजपची मातृसंस्‍था असणार्‍या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे
(आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपची खिल्‍ली उडवली आहे. ( Lok Sabha Election Results 2024 )
देवाचा न्याय खरा आणि आनंददायक
जयपूरजवळील कानोटा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना इंद्रश कुमार म्‍हणाले की, ज्‍यांनी प्रभू रामाची भक्‍की केली ते हळूहळू अहंकारी बनले. सर्वात मोठा पक्ष घोषित करण्‍यात आला; परंतू अहंकारामुळे प्रभू रामाने त्‍यांना २४१ वरच थांबवले. तर ज्यांचा रामावर विश्वास नव्हता, त्यांना एकत्रितपणे (इंडिया आघाडी) २३४ ला थांबवण्यात आले. देवाचा न्याय खरा आणि आनंददायक आहे.” ( Lok Sabha Election Results 2024 )
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सार्वजनिक सेवेत नम्रतेचे महत्त्व अधोरेखित केले होते. “खरा सेवक सन्मान राखतो. तो काम करताना शिष्टाचार पाळतो. मी हे काम केले, असे तो गर्विष्‍ठपणे सांगत नाही. ज्‍याला घमेंड त्याच्यात नसतो. केवळ त्या व्यक्तीलाच खरा सेवक म्हणता येईल. सर्वांप्रती नम्रता आणि सद्भावना आवश्यक आहे, असे नमूद केले होते. यानंतर अवघ्‍या दोन दिवसांमध्‍येच आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी अप्रत्‍यक्षपणे भाजपची उडवलेली खिल्‍ली चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा : 

Arvind Kejriwal |केजरीवालांच्या याचिकेवर कोर्टाकडून तुरूंग प्रशासनाला ‘उत्तर द्या’ नोटीस
‘NEET’ परीक्षा वाद : सर्वोच्‍च न्‍यायालयाची NTAला पुन्‍हा नोटीस

 
 

Go to Source