मध्य प्रदेशातील दतियात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ५ जण ठार

दतिया (मध्य प्रदेश) ; Bharat Live News Media ऑनलाईन मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी एक भीषण अपघात घडला. ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर तब्बल १५ जण जखमी झाले आहेत. रतनगढ माता मंदिरातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीमधून जात होते. यावेळी ट्रॉली उलटली. दुर्देवाने या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी ग्वाल्हेरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
