युरिक अ‍ॅसिडच्या समस्येत ओटस्चे सेवन गुणकारी

नवी दिल्ली : तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हाय युरिक अ‍ॅसिडच्या समस्येमध्ये ओटस्चे सेवन करणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या धान्यामध्ये असे काही गुण आहेत, जे या समस्येवर उत्तम उपाय मानले जातात. जर तुमचे शरीर प्रोटिनला चांगल्या प्रकारे पचवू शकत नसेल तर, अशावेळेस प्रोटिनमधून निघणारे वेस्ट प्युरिन शरीरात वाढत जातो. तसेच हे युरिक अ‍ॅसिड वाढवण्यापासून कमी …

युरिक अ‍ॅसिडच्या समस्येत ओटस्चे सेवन गुणकारी

नवी दिल्ली : तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हाय युरिक अ‍ॅसिडच्या समस्येमध्ये ओटस्चे सेवन करणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या धान्यामध्ये असे काही गुण आहेत, जे या समस्येवर उत्तम उपाय मानले जातात. जर तुमचे शरीर प्रोटिनला चांगल्या प्रकारे पचवू शकत नसेल तर, अशावेळेस प्रोटिनमधून निघणारे वेस्ट प्युरिन शरीरात वाढत जातो. तसेच हे युरिक अ‍ॅसिड वाढवण्यापासून कमी करते. जेव्हा हे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त होऊन हाडांमध्ये जमा व्हायला लागते, तेव्हा हाडांच्या सांध्यांमध्ये समस्या निर्माण व्हायला लागतात. अशावेळेस काही धान्य सेवन केल्यास फायदे मिळतात.
जेव्हा युरिक अ‍ॅसिड वाढते तेव्हा ओटस्चे सेवन कसे मदतगार ठरते व सोबत याचे काय फायदे आहेत जाणून घ्या. ओटस्मध्ये प्रति 100 ग्रॅम 50 ते 150 मिलिग्राम प्युरिन असते. पण, यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. जे प्युरिन पचविण्यासाठी कारागीर आहे. हे शरीरातील प्युरिकच्या कणांना अवशोषित करते. याशिवाय याव्यतिरिक्त प्युरिन पचविण्याची मेटाबोलिक रेट म्हणजेच चयापचयाचा दर वाढवते. ज्यामध्ये युरिक अ‍ॅसिडची समस्या कमी करण्यासाठी मदत मिळते.
जर तुम्हाला हाय युरिक अ‍ॅसिड किंवा गाठींची समस्या असेल, तर आठवड्यातून दोन वेळेस ओटस् खावे. यामध्ये तुम्ही अशा भाज्या सहभागी कराव्यात, ज्या युरिक अ‍ॅसिडची समस्या कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुमचे युरिक अ‍ॅसिड वाढले असेल, तर तुम्ही ओटस् भाज्यांसोबत वाफवून खावे. असे केल्यास अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील. जसे की, बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित समस्या आदी.