नागपूर : सासर्‍याची सुपारी देणार्‍या अर्चनाला हत्याकांडात भावाची मदत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  उच्चपदस्थ असलेल्या सुनेनेच संपत्तीच्या मोहापोटी सासर्‍याची सुपारी दिल्याच्या बहुचर्चीत पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांडाचा प्लॅन भावाच्या मदतीने सहा महिन्यांपूर्वीच रचण्यात आल्याचे उघड झाले आहेे. पोलिसांनी अर्चनाला गुरुवारी पुन्हा अटक केली. यासोबतच संकेत नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत पार्लेवार आणि बहिण अर्चना पुट्टेवार हे दोघे मास्टरमाईंड आहेत. सखोल तपासाच्या …

नागपूर : सासर्‍याची सुपारी देणार्‍या अर्चनाला हत्याकांडात भावाची मदत

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा :  उच्चपदस्थ असलेल्या सुनेनेच संपत्तीच्या मोहापोटी सासर्‍याची सुपारी दिल्याच्या बहुचर्चीत पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांडाचा प्लॅन भावाच्या मदतीने सहा महिन्यांपूर्वीच रचण्यात आल्याचे उघड झाले आहेे. पोलिसांनी अर्चनाला गुरुवारी पुन्हा अटक केली. यासोबतच संकेत नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी आरोपी प्रशांत पार्लेवार आणि बहिण अर्चना पुट्टेवार हे दोघे मास्टरमाईंड आहेत. सखोल तपासाच्या द़ृष्टीने या दोघांची आता आमने-सामने उलट तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार (82), रा. शुभनगर, मानेवाडा यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना बजरंगनगरात कारच्या धडकेत मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी आकस्मिक व नंतर अपघाती मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना व मुलगी योगिता आहेत. सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार यांचा मोठा भाऊ प्रविणच्या मृत्युनंतर पत्नी योगिता हिने पार्लेवारच्या संपत्तीतील पतीचा वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरु केला होता.