मायावती यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणे भोवले! केआरकेविरोधात गुन्हा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमाल राशिद खान उर्फ केआरकेविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बसपा प्रमुख मायावती यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी केआरकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक वाचा- हमारे बारह फेम अदिती धीमन| ‘मला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या..’ … The post मायावती यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणे भोवले! केआरकेविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

मायावती यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणे भोवले! केआरकेविरोधात गुन्हा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कमाल राशिद खान उर्फ केआरकेविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बसपा प्रमुख मायावती यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी केआरकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा-

हमारे बारह फेम अदिती धीमन| ‘मला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या..’

काय आहे संपूर्ण प्रकरण?
केआरकेने X अकाऊंटवर मायावती यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्यानंतर सहारनपूरच्या देवबंद ठाण्यात गुन्हा दाखल झाला. केआरके हा मुळचा सहारनपूर जिल्ह्यातील थाना देवबंदअंतर्गत ग्राम फुलास अकबरपूरचा रहिवासी आहे. केआरकेवर बसपा नेते सुशील कुमार यांनी केस दाखल केली आहे.
अधिक वाचा-

अक्षय कुमारचं कमबॅक! ‘खेल खेल में’शी ‘या’ २ तगड्या कलाकारांची टक्कर

सोशल मीडियावर वादग्रस्त विधानानंतर मायावती यांच्या आदेशानंतर केआरकेचे भाऊ, सहारनपूर लोकसभा क्षेत्राचे बसपा उमेदवार माजिद अली यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. कमालचा भाऊ माजिद अली यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पणे ते पराभूत झाले. दरम्यान, याप्रकरणी माजिद अली म्हमाले होते की, त्यांचे केआरकेशी मागील १५ वर्षांपासून कोणताही संबंध नाही.
अधिक वाचा-

‘शादी के डायरेक्टर करण और जौहर’ नावाचा चित्रपट थांबवा, करण जोहरची कोर्टात धाव

केआरके विरोधातील तक्रारीत काय म्हटलंय?
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, बसपा प्रमुखवर करण्यात आलेल्या विधानामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. दलित समाज मायावती यांचे मनापासून सन्मान आणि आदर करतो. कमाल राशिद खानने X वर बहिणविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून दलित समाजाला अपमानित केलं आहे.
 
Latest Marathi News मायावती यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणे भोवले! केआरकेविरोधात गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.