ब्रेकिंग| अजित डोवाल सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी (NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. तर पीके मिश्रा हे पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून कायम राहणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉ. पी.के. यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आयएसएस (सेवानिवृत्त) अधिकारी डॉ. पी. के. मिश्रा हे सोमवार १० जून २०२४ पासून पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते सह-टर्मिनस असेल.त्यांच्या पदाच्या कार्यकाळात, त्यांना प्राधान्यक्रमाच्या सारणीमध्ये कॅबिनेट मंत्री पद दिले जाईल, असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सोमवार १० जून २०२४ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तिथेपर्यंत माजी आयएएस अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून काम पाहतील. ते भारत सरकारच्या सचिव पद श्रेणीत असणार आहेत, असेही एएनआयने म्हटले आहे.
Ajit Doval appointed as National Security Advisor for a third time, appointment co-terminus with PM Modi pic.twitter.com/TTLRotwQbB
— ANI (@ANI) June 13, 2024
Appointments Committee of the Cabinet approves the appointment of Dr. P.K. Mishra, lAS (Retired) as Principal Secretary to Prime Minister with effect from 10.06.2024. His appointment will be co-terminus with the term of the Prime Minister or until further orders whichever is… pic.twitter.com/9TfLd5aHZH
— ANI (@ANI) June 13, 2024
The post ब्रेकिंग| अजित डोवाल सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी appeared first on Bharat Live News Media.
