सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १ ठार, ५ जण बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क: सिक्कीममध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मंगन आणि उत्तर सिक्कीममधील विविध ठिकाणी प्रचंड आणि विनाशकारी भूस्खलन झाले आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण बेपत्ता (Sikkim landslide) झाले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिसे आहे. सिक्कीममधील मुसळधार पावसामुळे कालिम्पाँग जिल्ह्यातील तीस्ता बाजारजवळ स्ता नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे बाजूला असलेली … The post सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १ ठार, ५ जण बेपत्ता appeared first on पुढारी.

सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १ ठार, ५ जण बेपत्ता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: सिक्कीममध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मंगन आणि उत्तर सिक्कीममधील विविध ठिकाणी प्रचंड आणि विनाशकारी भूस्खलन झाले आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण बेपत्ता (Sikkim landslide) झाले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिसे आहे.
सिक्कीममधील मुसळधार पावसामुळे कालिम्पाँग जिल्ह्यातील तीस्ता बाजारजवळ स्ता नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे बाजूला असलेली अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. भूस्खलनामुळे सिक्कीममधील अप्पर ग्याथांग आणि तरग गावात मोठ्या प्रमाणा घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मंगणमधील जिल्हा मुख्यालयाला जोडणारा महत्त्वाचा रस्ताही भूस्खलनानंतर (Sikkim landslide) बंद करण्यात आला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगण येथील पाक्षेप परिसरात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली, तर रंगरंगजवळील आंबीथांग येथून तीन जण आणि पाकशेप येथील दोन जण बेपत्ता आहेत. दक्षिण सिक्कीममधील मेल्ली स्टेडियममध्ये तीस्ता नदी ओसंडून वाहत असल्याने परिस्थिती आणखी बिकट (Sikkim landslide)  झाली आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

#WATCH | Due to heavy rain in Sikkim, many houses situated beside the River Teesta near Teesta Bazar of Kalimpong district, West Bengal, have been submerged.
Restoration work has been started. pic.twitter.com/VNbdHcy9l3
— ANI (@ANI) June 13, 2024

#WATCH | One person dead, five missing and houses damaged due to heavy rain in Mangan, Sikkim
(Video source: SSP Mangan) pic.twitter.com/lo7iD8tAFH
— ANI (@ANI) June 13, 2024

#WATCH | Due to heavy rain in Sikkim, many houses situated beside the River Teesta near Teesta Bazar of Kalimpong district, West Bengal, have been submerged. Restoration work has been started. pic.twitter.com/8tHmrcfYdd
— ANI (@ANI) June 13, 2024

Latest Marathi News सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १ ठार, ५ जण बेपत्ता Brought to You By : Bharat Live News Media.