पैठण : तरुण शेतकऱ्याचा वीजेचा झटका लागून मृत्यू; तीन दिवसात दुसरी घटना

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे वीजेचा झटका लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१३) सकाळी घडली. दरम्यान तीन दिवसांमध्ये वीजेचा झटका लागून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.
तालुक्यातील विहामांडवा येथे गुरुवारी रोजी सकाळी योगेश बाळू बाबर (वय २५) हा तरुण शेतकरी शेतीची मशागत करत होता. काम करत असताना शेतातील विद्युत मोटरीच्या वायरवर पाय पडल्याने. त्याला वीजेचा झटका बसला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून पंचनामा केला.
नातेवाईकांनी पोलिसाच्या मदतीने पाचोड येथील शासकीय रुग्णालयात योगेशला दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेचा पुढील तपास विहामांडवा पोलीस चौकीचे जमादार ताराचंद धडे करीत आहे. तीन दिवसांपूर्वी बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तोंडोली गावामध्ये वीजेचा झटका लागून एक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विहामांडवा येथील घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककाळ पसरली आहे.
Latest Marathi News पैठण : तरुण शेतकऱ्याचा वीजेचा झटका लागून मृत्यू; तीन दिवसात दुसरी घटना Brought to You By : Bharat Live News Media.
