
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशांतर्गत शेअर बाजारांनी आज विक्रमी उच्चांक गाठला. दिवसभर बाजारांनी आपली तेजीची घाैडदाैड कायम ठेवली. इंट्राडेमध्ये, निफ्टीने 23,481 आणि सेन्सेक्सने 77,145 चा नवीन विक्रम केला. मात्र व्यवहार बंद हाेताना निफ्टी 75 अंकांनी वाढून 23,398 वर बंद झाला. तर सेन्सेक्स 204 अंकांनी वाढून 76,810 वर आणि निफ्टी बँक 48 अंकांनी घसरून 49,846 वर बंद झाला.
शेअर बाजारात काय घडलं?
बाजाराने आज पुन्हा एकदा नवा विक्रम केला
निफ्टीने 23,481 चा नवा विक्रम
सेन्सेक्सने 77,145 चा नवा विक्रम
निफ्टी 75 अंकांनी वाढून 23,398 वर बंद
सेन्सेक्स 204 अंकांनी वाढून 76,810 वर बंद
Sensex rises 204.33 points to hit a new peak of 76,810.90; Nifty climbs 75.95 points to settle at a record 23,398.90
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2024
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात,सेन्सेक्स-निफ्टी नव्या विक्रमावर
देशांतर्गत शेअर बाजारात आज (दि. १३ ) दमदार सुरुवात झाली. सेन्सेक्स-निफ्टी नवीन विक्रमी पातळीवर उघडले. त्याच वेळी निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही उच्च पातळीवर आहे. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांच्या वाढीसह 77,102 वर उघडला आणि नंतर 77,145 च्या विक्रमी पातळीवर गेला. निफ्टीही 158 अंकांच्या वाढीसह 23,481 च्या विक्रमी पातळीवर उघडला. बँक निफ्टी 284 अंकांच्या वाढीसह 50,179 अंकांवर तर निफ्टी मिडकॅप 421 अंकांच्या वाढीसह 54,647 अंकांवर उघडला आणि 54,753 च्या पातळीवर गेला.
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. बुधवारी ( दि. १२) देशांतर्गत आणि अमेरिकन चलनवाढीचे सकारात्मक वाटचालने बाजाराला दिलासा मिळाला. याचे परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावर पाहायला मिळाले. सुमारे 2123 शेअर्स धारले तर 346 समभाग घसरले. तर 107 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला आहे.
आजच्या व्यवहारात एनबीएफसी श्रीराम फायनान्सचा समभाग निफ्टीवर सर्वाधिक वाढणारा होता. कंपनीचे मार्केट कॅप प्रथमच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. याशिवाय HDFC लाइफ, Divi’s Lab, Titan या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर, HUL, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रीडमध्ये घसरण नोंदवली गेली. भारतीय रुपया आज कोणताही बदल झाला नाही. व्यवहाराच्या शेवटी, रुपया डॉलरच्या तुलनेत 83.55/$ वर न बदलता बंद झाला.
विमा कंपनीचे शेअर्स वधारले
आजच्या व्यवहारात विमा कंपनीचे शेअर्संनी तेजी अनुभवली. एचडीएफसी लाईफ चार टक्क्यांहून अधिक वाढला. तर तसेच एमएफएसएल, आयसीआयसीआय पीआरयूमध्येही खरेदी झाली.
टॉप गेनर्स, टॉप लूज़र्स
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, श्रीराम फायनान्स, डिव्हीज लॅब, टायटन कंपनी आणि एल अँड टी हे निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक वाढले होते. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, आयशर मोटर्स, ब्रिटानिया, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय निफ्टी 50 मध्ये घसरण अनुभवली.
Latest Marathi News शेअर बाजाराची नवी ‘भरारी’..! सेन्सेक्स @ 76,810 Brought to You By : Bharat Live News Media.
