तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून महिलेची साडेआठ लाखात फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव विवेकानंद कॉलनीतील महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगून तसेच या गुन्ह्यात तीन वर्षाची शिक्षा होणार असल्याचे धमकी देऊन आम्ही सीबीआय अधिकारी असल्याचे खोटे सांगून महिलेला साडेआठ लाख रुपयांमध्ये फसविल्याचा प्रकार बुधवार (दि.१२) रोजी उघडकीस आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात तोतया सी बी आय अधिकारी असल्याचे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला … The post तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून महिलेची साडेआठ लाखात फसवणूक appeared first on पुढारी.

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून महिलेची साडेआठ लाखात फसवणूक

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – चाळीसगाव विवेकानंद कॉलनीतील महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगून तसेच या गुन्ह्यात तीन वर्षाची शिक्षा होणार असल्याचे धमकी देऊन आम्ही सीबीआय अधिकारी असल्याचे खोटे सांगून महिलेला साडेआठ लाख रुपयांमध्ये फसविल्याचा प्रकार बुधवार (दि.१२) रोजी उघडकीस आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात तोतया सी बी आय अधिकारी असल्याचे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चाळीसगाव शहरातील विवेकानंद कॉलनी भागात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षीय नोकरदार महिलेला मंगळवार (दि.११) रोजी व्हॉटसॲप वरुन फोन आला. त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव अनिल यादव सांगत, तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. संबधित महिला एका गुन्ह्यात अडकली असल्याचे सांगितले. सुरुवातीला महिलेने या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला, तसेच संबधित व्यक्तीने देखील आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला घाबरली, काही वेळानंतर हे फोन येतच राहिले. तसेच ज्या गुन्ह्यात ती महिला अडकली असल्याचे सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यात महिलेला ३ वर्षाची शिक्षा होणार असल्याचीही धमकी संबधितांनी महिलेला दिली. तसेच या शिक्षेपासून वाचायचे असल्यास ऑनलाईन पध्दतीने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली. यानंतर घाबरलेल्या महिलेने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्यांच्या म्हणण्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबधित महिलेने त्या दोघांना फोन केला. मात्र, दोघांचे फोन नंबर बंद आले. त्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, संबंधित महिलेने सायबर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरुध्द तक्रार दाखल केली असुन त्यानुसा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:

जळगाव : भुसावळ नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वृक्ष लागवड
भुजबळांनी मला शुभेच्छा दिल्या: राज्‍यसभा अर्ज दाखल केल्‍यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

Latest Marathi News तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून महिलेची साडेआठ लाखात फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.