गतविजेत्या दिग्गज संघांसह ‘ह्या’ संघांवर टांगती तलवार

पुढारी ऑनलाईन डेस्क| T20 WC 2024 : क्रिकेट जगतात सध्या टी-20 वर्ल्डकपचे वारे जोरात वाहत आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये नवख्या संघांनी दिग्गज संघांना पराभूत करताना आपण पाहिलं आहे. जसजशी स्पर्धा पुढं सरकत आहे. स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये कोणते संघ आपले स्थान मिळवणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिज … The post गतविजेत्या दिग्गज संघांसह ‘ह्या’ संघांवर टांगती तलवार appeared first on पुढारी.
गतविजेत्या दिग्गज संघांसह ‘ह्या’ संघांवर टांगती तलवार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क| T20 WC 2024 : क्रिकेट जगतात सध्या टी-20 वर्ल्डकपचे वारे जोरात वाहत आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये नवख्या संघांनी दिग्गज संघांना पराभूत करताना आपण पाहिलं आहे. जसजशी स्पर्धा पुढं सरकत आहे. स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये कोणते संघ आपले स्थान मिळवणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांनी शानदार खेळी करत 3 सामन्यात विजय मिळवून सुपर 8 मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. परंतु, सुपर 8 मध्ये कोणते संघ एन्ट्री करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घेवूयात सुपर 8 चे समीकरण.
या संघांचे सुपर 8 मधील स्थान निश्चित
भारत, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी स्पर्धेमध्ये प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवून त्यांनी प्रत्येकी 6 गुणांची कमाई केली आहे. यामध्ये अ गटात भारत, ब गटात ऑस्ट्रेलिया, क गटात वेस्ट इंडिज आणि ड गटात द. आफ्रिका गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. (T20 WC 2024)
‘या’ संघांवर टांगती तलवार
स्पर्धेमध्ये नवखे संघ सरप्राईज पॅकेट ठरत आहेत. त्यांनी दिग्गज संघांना पराभूत करून हम भी किसी से कमी नही या वाक्याला साजेशी खेळी केली आहे. अमेरिकेच्या नवख्या संघाने साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तनाला पराभूत करून मोठा उलटफेर केला. यानंतर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. यामुळे पाकिस्तानला 3 पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला. यामुळे पाकिस्तानने 3 सामन्यात केवळ 2 गुणाची कमाई केली आहे. तर अमेरिकाचा संघ तीन सामन्यात दोन विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर पाकिस्तान आपले स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवायचे असल्यास त्यांना स्पर्धेतील उर्वरीत सामन्यात विजय मिळवणे महत्वाचे आहे. गतिविजेता इंग्लंडचा संघाने स्पर्धेत ब गटातील आतापर्यंत दोन सामने खेळले. यामध्ये पहिला सामना पावसात वाहून गेला. तर दुसऱ्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.
तर क गटात असलेल्या न्यूझीलंड संघाला देखील अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले. यामध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ड गटातील साखळी फेरीत श्रीलंकाला देखील चमकदार कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेला साखळी फेरीतील दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर बांगलादेशविरूद्ध त्यांना विजय मिळवता आला. (T20 WC 2024)

Three from three for India at the #T20WorldCup and a berth in the second round secured 🙌
Watch the highlights from their victory over USA ⬇️https://t.co/7dGUQ3cCqZ
— T20 World Cup (@T20WorldCup) June 13, 2024

The post गतविजेत्या दिग्गज संघांसह ‘ह्या’ संघांवर टांगती तलवार appeared first on Bharat Live News Media.