मोदींसाठी पक्षकार्याला प्रत्येकाने वेळ द्यावा : आ. चंद्रशेखर बावनकुळे

राहाता : पुढारी वृत्तसेवा :  आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी सर्वाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 45 जागा जिंकायच्या असून, याकरीता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसातले 3 तास 13 मिनिटे पक्षकार्याला समर्पित भावनेने द्यावेत, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तीन विधानसभा मतदारसंघातील … The post मोदींसाठी पक्षकार्याला प्रत्येकाने वेळ द्यावा : आ. चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.
#image_title

मोदींसाठी पक्षकार्याला प्रत्येकाने वेळ द्यावा : आ. चंद्रशेखर बावनकुळे

राहाता : पुढारी वृत्तसेवा :  आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी सर्वाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 45 जागा जिंकायच्या असून, याकरीता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसातले 3 तास 13 मिनिटे पक्षकार्याला समर्पित भावनेने द्यावेत, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तीन विधानसभा मतदारसंघातील वॉरियसर्सशी संवाद साधण्यासाठी आ. बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महामंत्री विजय चौधरी, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, राजेंद्र गोंदकर, महिला जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, सरचिटणीस नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष दिपक रोहम आदी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला संपूर्ण जगातून आता समर्थन मिळत आहे. 2024च्या निवडणुकीत आपल्या विश्वनेतृत्वाला पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी देशातील जनता उत्सुक असून याकरीता जनतेचे समर्थन संपर्क अभियानातून पक्ष आला मिळवायचे असल्याचे आ. बावनकुळे यांनी सांगितले. मागील दहा वर्षेच्या कार्यकाळात मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयामुळे एक विकसित देशाची प्रतिमा जगात निर्माण झाली आहे. मागील 65 वर्ष काँग्रेसची आपण पाहीली. परंतू मोदींची यशस्वी कारकीर्द आज संपूर्ण जगात नावलौकीक मिळविणारी ठरली असल्याचे नमूद करून आत्मनिर्भर भारताची वाटचाल यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधून आ. बावनकुळे म्हणाले की, राज्यात 45 लोकसभा मतदार संघात आपल्याला विजय मिळवायचा आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसातील तीन तास तेरा मिनिटे संघटनेचे काम करा. संपर्क अभियानातून सरकारच्या योजना लोकांपर्यत घेवून जाण्याचे आवहन त्यांनी केले.
मोफत धान्य योजनेची मुदतवाढ 2029 पर्यत वाढवून प्रधानमंत्र्यांनी देशातील सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले. समाजातील सर्व समाज घटकांना योजनारूपी लाभ देण्याचे मोठे काम सुरू आहे. या सर्व योजना समाज माध्यमातून लोकापर्यंत पोहचविण्याचे काय वॉरिर्यसने करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
The post मोदींसाठी पक्षकार्याला प्रत्येकाने वेळ द्यावा : आ. चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

राहाता : पुढारी वृत्तसेवा :  आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी सर्वाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 45 जागा जिंकायच्या असून, याकरीता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसातले 3 तास 13 मिनिटे पक्षकार्याला समर्पित भावनेने द्यावेत, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तीन विधानसभा मतदारसंघातील …

The post मोदींसाठी पक्षकार्याला प्रत्येकाने वेळ द्यावा : आ. चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Go to Source