“माझं एक झाड माझ्यासाठी माझ्या शहरासाठी”: मुख्याधिकारी महेश वाघमोडे

भुसावळ (जळगाव) : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यात व भुसावळ शहरात यंदा 45 अंशापार तापमान गेले होते. भविष्यात उष्णतेची लाट नागरिकांना व मुलांना सहन करावी लागू नये म्हणून प्रत्येकाने एक झाड लावले व जगविले तर दोन लाख झाडे सहज लागलील. त्यामुळे यावर्षी “माझं एक झाड माझ्यासाठी, माझ्या शहरासाठी” या ब्रीद ने वृक्षारोपण करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी स्वतः … The post “माझं एक झाड माझ्यासाठी माझ्या शहरासाठी”: मुख्याधिकारी महेश वाघमोडे appeared first on पुढारी.
“माझं एक झाड माझ्यासाठी माझ्या शहरासाठी”: मुख्याधिकारी महेश वाघमोडे

भुसावळ (जळगाव) : Bharat Live News Media वृत्तसेवा – जिल्ह्यात व भुसावळ शहरात यंदा 45 अंशापार तापमान गेले होते. भविष्यात उष्णतेची लाट नागरिकांना व मुलांना सहन करावी लागू नये म्हणून प्रत्येकाने एक झाड लावले व जगविले तर दोन लाख झाडे सहज लागलील. त्यामुळे यावर्षी “माझं एक झाड माझ्यासाठी, माझ्या शहरासाठी” या ब्रीद ने वृक्षारोपण करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. नागरिकांनीही किमान एक वृक्ष लावले आणि जगवले तर निश्चितच शहर हरित होण्याबरोबरच स्वच्छ शहर होईल. असे आवाहन मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले आहे.
भुसावळ नगरपरिषद भुसावळच्या वतीने नगरपरिषदेने 10 एच ओ डी अधिकारी नेमले असून प्रत्येक एचओडीला 1000 वृक्ष लागवडीचे टारगेट दिले आहे. या माध्यमातून 21 जून पर्यंत दहा हजार झाडे लागली जातील यासाठी नागरिकांनी एचओडी यांना सहकार्य करावे. त्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी बुधवार (दि.१२) रोजी पुढाकार घेत वृक्षारोपणाला सुरुवात केली असून सर्व कर्मचारी वर्गानेही वृक्षलागवड करत आहेत.

तुम्ही केव्हा…?
“मी लावले माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी झाड तुम्ही केव्हा लावत आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी झाड?” जास्तीत जास्त झाडे लावूया आणि त्याचे संवर्धन संगोपन करूया तरच पुढील जीवन सुखकर होईल. नगरपरिषदेतील सर्व प्रमुख अधिकारी यांनी बुधवार (दि.१२ रोजी प्रत्यक्ष प्रत्येकी दहा दहा झाडे लावले. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी स्वतः 53 तर कर्मचारी यांनी 80 झाडे घेऊन वॉटर सप्लाय विभागाच्या जागेत वृक्षारोपण केले.

नगरपरिषदेच्या जागेवर मुख्याधिकारी महेश वाघमोडे, अग्निशमन विभागाचे विवेक माकोडे, पर्यावरण नागर प्रतिष्ठानचे तथा भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील, उपमुख्यधिकारी शेख परवेश, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, माझी वसुंधराचे प्रमुख दीपक चौधरी, आरोग्य विभागाचे प्रदीप पवार, वृक्ष समितीचे सतीश देशमुख, वैभव पवार यांनीही वृक्षारोपण केले.
बुधवार (दि.१२) रोजी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी मुख्याधिकारी महेश वाघमोडे, विवेक माकोडे, नाना पाटील, दीपक चौधरी, प्रदीप पवार, लोकेश ढाके, परवेश शेख, वैभव पवार, भिका सोनवणे, रमेश भाऊ त्यासोबतच अग्निशमन विभागाचे कर्मचारी वर्ग, वॉटर सप्लाय विभागाचे कर्मचारी वर्ग, माझी वसुंधराचे कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:

Indian Railway | 1 जून पासून प्रवासी गाडीच्या अप ॲण्ड डाऊनच्या वेळेत काय झाला बदल.. पहा
Jalgaon Crime News | गावठी कट्टासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरूणाला अटक

Latest Marathi News “माझं एक झाड माझ्यासाठी माझ्या शहरासाठी”: मुख्याधिकारी महेश वाघमोडे Brought to You By : Bharat Live News Media.