भुसावळ विभागातील प्रवासी गाडीच्या वेळेत बदल
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – भुसावळ विभागातील काही प्रवासी गाडीच्या आगमन आणि प्रस्थान वेळापत्रकात 1 जून पासून बदल करण्यात आला आहे. हा बदल प्रवास सुरु 1 जून पासून लागू झाला असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त झाली आहे.
सुधारित वेळापत्रक असे…
गाडी क्रमांक २०७०६ मुंबई ते जालना वंदेभारत एक्सप्रेस
नासिक स्थानक येथे आगमन वेळ १६.१८ आणि सुटण्याची वेळ १६.२०
मनमाड स्थानक येथे आगमन वेळ १७.१८ आणि सुटण्याची वेळ १७.२०
गाडी क्रमांक ११०२५ पुणे ते अमरावती हुतात्मा एक्सप्रेस
भुसावळ स्थानक येथे आगमन वेळ २०.३० आणि सुटण्याची वेळ २०.३५
गाडी क्रमांक ११०२६ अमरावती ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस
भुसावळ स्थानक येथे आगमन वेळ ०२.२० आणि सुटण्याची वेळ ०२.२५
जळगांव स्थानक येथे आगमन वेळ ०२.५० आणि सुटण्याची वेळ ०२.५२
पाचोरा स्थानक येथे आगमन वेळ ०३.२३ आणि सुटण्याची वेळ ०३.२५
कजगांव स्थानक येथे आगमन वेळ ०३.४४ आणि सुटण्याची वेळ ०३.४५
चाळीसगांव स्थानक येथे आगमन वेळ ०३.५८ आणि सुटण्याची वेळ ०४.००
गाडी क्रमांक १२०७२ हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
नाशिकरोड स्थानकावर आगमन वेळ १२.४५ आणि सुटण्याची वेळ १२.४५
गाडी क्रमांक १२१०८ सीतापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
नाशिक स्थानकावर आगमन वेळ १७.४७ आणि सुटण्याची वेळ १७.५०
गाडी क्रमांक २२१२३ पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस
नांदुरा स्टेशनवर आगमन वेळ २३.४४ आणि सुटण्याची वेळ २३.४५
अकोला स्थानकावर आगमन वेळ ००. ४५ तास आणि सुटण्याची वेळ ००.४७
गाडी क्रमांक १२१८७ जबलपूर-मुंबई गरिब्रथ एक्सप्रेस
नाशिकरोड स्थानकावर आगमन वेळ ०७.४२ आणि सुटण्याची वेळ ०७.४५
गाडी क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस
नाशिक रोड स्थानकावर आगमन वेळ ०२.१५ तास आहे तर सुटण्याची वेळ २.१८ गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करण्याचे प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा:
जळगाव : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
एसटी महामंडळातील बदल्या पारदर्शक होणार…
Latest Marathi News भुसावळ विभागातील प्रवासी गाडीच्या वेळेत बदल Brought to You By : Bharat Live News Media.