वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : सरकार सोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कार्यवाही पाहिजे आहे. ‘सगेसोयरे’ अंमलबजावणीला १२-१२ महिने लागतात का? असा संतप्त सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सरकारला केला आहे.
मी सरकार सोबत चर्चेसाठी तयार आहे. पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. सरकारला मी वारंवार सांगितलं आहे ते भेटायला येणार की चर्चेसाठी येणार ही किचकट गोष्ट आहे. आज शिष्टमंडळ येणार आहे. पण यामध्ये कोण येणार मला माहीत नाही. ते कालच येणार होते, पण आले नाहीत. मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतात. मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. ओबीसी नेत्यांना गोंदी पोलिसांनी नोटीस बजावली आहे, अंतरवालीत उपोषण करता येणार नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय, असे विचारले असता मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, असे जरांगे म्हणाले.
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’ मराठ्यांचा कार्यक्रम करतात : मनोज जरांगे
सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल
पूर्णेत मराठा समाजाचे सरकारविरूद्ध बोंब मारो आंदोलन
Latest Marathi News ‘सगेसोयरे’ अंमलबजावणीला १२ महिने लागतात का? : जरांगे Brought to You By : Bharat Live News Media.