Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आमचा पक्ष बिहारमधील विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिली. दिल्लीमधील सरकार प्रमाणेच बिहारमध्येही सुशासन आणण्यासाठी आम्ही तयारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये किती जागांवर उमेदवार देणार हे अद्याप ठरलेले नाही. याबाबत आम्ही चर्चेअंती निर्णय घेणार आहोत. मात्र आम आदमी पार्टी बिहारमध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि आसाममध्ये आम आदमी पार्टीने २२ जागा लढविल्या होत्या. यामधील पंजाबमध्ये तीन जागांवर विजय मिळला आहे. तसेच 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुका प्रमाणेच दिल्लीत पुन्हा एकदा आपची पाटी कोरीच राहिली आहे.
Latest Marathi News ‘आप’ लढविणार बिहार विधानसभा निवडणूक : संजय सिंह Brought to You By : Bharat Live News Media.
‘आप’ लढविणार बिहार विधानसभा निवडणूक : संजय सिंह