जळगाव: Bharat Live News Media वृत्तसेवा – मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतातील विहिरीत ढकलून देत पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. भवरखेडा ता. धरणगाव येथील ही खळबळजनक घटना तब्बल दहा दिवसांनी उघडकीस आली आहे.
प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) (वय ३६, रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अर्जुन शिवाजी धोबी (रा.भवरखेडा) यांनी फिर्याद दिली. रविवार (दि.२) रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी हिने पती प्रकाश यास तिच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने पतीला नेले.
त्यानंतर पतीचा दिव्यांगत्वाचा फायदा घेवून त्याला विहिरीत ढकलून दिले. ही घटना बुधवार (दि.१२) रोजी उघडकीस आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.
हेही वाचा:
पिंपळनेर : आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव येथे भगर भरडणी यंत्र सुरू
बर्थडेला दिशाचा ‘कल्की 2898 AD’ मधील लूक; रिलीज आधीच ‘RRR’चा मोडला रेकॉर्ड
Latest Marathi News “चला मंदिरात पाया पडायला जाऊया”! म्हणत पत्नीने काढला पतीचा काटा Brought to You By : Bharat Live News Media.