T20 WC : ‘सुपर 8’मध्‍ये टीम इंडियासमोर मोठे आव्‍हान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेस्‍ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्‍तपणे सुरु असणार्‍या T20 विश्वचषक स्‍पर्धातील प्रारंभीचा टप्‍पा मोठा रंगतदार झाला आहे. साखळी सामन्‍यात काही संघांनी अनपेक्षित कामगिरी करत दिग्‍गज संघांना धक्‍के दिले आहेत. आता सुपर-8चे चित्र स्‍पष्‍ट होत आहे. बुधवारी (दि.१२ जून) अमेरिकेचा पराभव करुन सलग तिसर्‍या विजयाची नोंद करत टीम इंडियाने दिमाखात सुपर-8 मध्ये आपले …
T20 WC : ‘सुपर 8’मध्‍ये टीम इंडियासमोर मोठे आव्‍हान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : वेस्‍ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्‍तपणे सुरु असणार्‍या T20 विश्वचषक स्‍पर्धातील प्रारंभीचा टप्‍पा मोठा रंगतदार झाला आहे. साखळी सामन्‍यात काही संघांनी अनपेक्षित कामगिरी करत दिग्‍गज संघांना धक्‍के दिले आहेत. आता सुपर-8चे चित्र स्‍पष्‍ट होत आहे. बुधवारी (दि.१२ जून) अमेरिकेचा पराभव करुन सलग तिसर्‍या विजयाची नोंद करत टीम इंडियाने दिमाखात सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघ ‘अ’ गटात अव्वल स्थानावरच राहणार आहे. त्याचप्रमाणे, ऑस्ट्रेलियन संघ आपल्या गट-ब मध्ये अव्वल आहे, परंतु तो केवळ बी-2 मानला जाईल. अशा परिस्थितीत सुपर-8 फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ एकाच गटात असतील. आता सुपर8 मध्‍ये भारत आणि ऑस्‍ट्रेलिया केव्‍हा आमने-सामने येणार ते पाहूया…
सुपर 8 मध्‍ये भारताचा पहिला सामना २० जून रोजी
T20 विश्वचषक स्‍पर्धातील ‘ सुपर 8’ मध्‍ये भारताने आपले स्‍थान पक्‍के केले आहे. आता सुपर-8 फेरीत प्रत्‍येकी चार संघांचा एक गट असेल. प्रत्‍येक गटात एक संघाचे तीन सामने होतील. या गटांमधील अव्‍वल स्‍थानी राहणारे दोन संघ उपांत्‍य फेरीत धडक मारतील. भारतीय संघ सुपर-8 फेरीतील पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोस येथे क गटातील अव्वल संघाविरुद्ध खेळेल. क गटात अव्वल स्थान मिळवणारा संघ अद्याप निश्चित झालेला नाही.
वेस्ट इंडिजला C2 मानांकन देण्यात आले. अशा स्थितीत अफगाणिस्तानचा संघ C1 वर कायम राहू शकतो. मात्र, 14 जूनला त्याचा सामना पापुआ न्यू गिनीशी होणार आहे. या सामन्याच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. अशा परिस्थितीत सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा सामना पहिला सामना अफगाणिस्‍तानबरोबरील होईल,अशीही शक्‍यता आहे.
T20 विश्वचषक स्‍पर्धातील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने २६ जून (त्रिनिदाद) आणि २७ (गियाना) रोजी खेळवले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर त्याचा सामना गियानामध्‍ये होईल. तसेच T20 विश्वचषक स्‍पर्धातील अंतिम सामना बार्बाडोस येथे २९ जून रोजी होणार आहे.
हेही  वाचा: 

Narendra Modi | PM मोदी इटली दौऱ्यावर, G7 शिखर परिषदेत सहभागी होणार
Rainfall Forecast| पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ भागात हलका ते मध्यम पाऊस