Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘शादी के डायरेक्टर करण और जौहर’ नावाचा चित्रपट थांबवण्याची मागणी करण जोहरने कोर्टाकडे केली आहे. हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. करणने आपल्या अर्जात लिहिलंय, चित्रपटाच्या नावाच्या माध्यमातून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
जुनैद खानचा महाराज चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी
करण पोहोचला कोर्टात
चित्रपट दिग्दर्शक करण ‘शादी के डायरेक्टर करण और जौहर’च्या निर्मात्यांविरोधात बॉम्बे हायकोर्टात पोहोचले. त्यांचं म्हणणं आहे की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या नावाचा गैरवापर करणे थांबवावा. हा चित्रपट १४ जून, २०२४ रोजी रिलीज होणार आहे. आज करणच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. करण जोहरने DSK लीगलच्या माध्यमातून प्रोड्यूसर इंडिया प्राईड एडव्हायजरी आणि संजय सिंहसोबत रायटर-डायरेक्टर बबलू सिंह विरोधात उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. या केसमध्ये संजय सिंह आणि इतर जणांविरुद्ध चित्रपटाच्या टायटलमध्ये त्याच्या नावाचा वापर करण्यावर कायमसाठी बंदी घालण्याचे आदेशाची मागणी केली आहे.
अधिक वाचा –
स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं “जंतर मंतर” रिलीज
करण जोहरच्या नावाचा गैरवापर
केसमध्ये करणकडून दावा करण्यात आला आहे की, संबंधितांचा चित्रपट आणि ‘करण जौहर’ या नावाचा काही संबंध नाही. माझ्या नावाचा त्यांच्या चित्रपटाच्या शीर्षकासाठी अवैधपणे उपयोग करत आहेत. त्याने सांगितले की, चित्रपटाच्या शीर्षकामध्ये थेट माझ्या नावाचा वापर करण्यात आला आहे, जे त्याच्या व्यक्तिमत्व, प्रसिद्धी आणि गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करते.
अधिक वाचा –
तापसी पन्नूची छोटी बहिण तिच्यापेक्षाही हॉट, फोटो पाहाच!
करणने याचिकेत म्हटलं आहे की, चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ट्रेलर आणि पोस्टर सोशल मीडियावर जारी केले गेले आहेत.