नाशिक तालुका सीमेवर बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थांवर जागरणाची वेळ

देवळाली कॅम्प (नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा – नाशिक तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहशिंगवे गावात 24 तासांपैकी फक्त दोन तास वीजपुरवठा होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात बिबट्याच्या डरकाळ्यांनी संपूर्ण गाव गेल्या तीन दिवसांपासून रात्र जागून काढत आहे. तसेच गावातील विहिरीला पाणी असूनही वीजपुरवठा होत नसल्याने बादलीच्या साह्याने पाणी भरावे लागत असल्याची व्यथा येथील गावकऱ्यांना सोसावी लागत आहे. नाशिक-इगतपुरीच्या …

नाशिक तालुका सीमेवर बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थांवर जागरणाची वेळ

देवळाली कॅम्प (नाशिक)  : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहशिंगवे गावात 24 तासांपैकी फक्त दोन तास वीजपुरवठा होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात बिबट्याच्या डरकाळ्यांनी संपूर्ण गाव गेल्या तीन दिवसांपासून रात्र जागून काढत आहे.
तसेच गावातील विहिरीला पाणी असूनही वीजपुरवठा होत नसल्याने बादलीच्या साह्याने पाणी भरावे लागत असल्याची व्यथा येथील गावकऱ्यांना सोसावी लागत आहे. नाशिक-इगतपुरीच्या सीमेवर असलेल्या लोहशिंगवे, वंजारवाडी गावातील ग्रामस्थांना सध्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या गावाच्या तीनही बाजूला डोंगरदऱ्या व नाले असून, लष्कराच्या जंगलाचा वेढा पडलेला आहे. त्यामुळे या भागात अनेक बिबट्यांचे वास्तव्य आहे. दिवसाढवळ्या नागरिकांवर हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. सध्या महावितरण कंपनी लोहशिंगवे, वंजारवाडी भागाला धामणगाव फिडरमधून सकाळी 9 ते 11 असा दोनच तास वीजपुरवठा करते. या कालावधीत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून जलकुंभ भरण्याचे कामदेखील पूर्ण होत नाही. त्यामुळे पाणी असून गावाची तहान भागवली जात नाही. पावसाळा सुरू झालेला असताना उन्हाळ्यापेक्षा भयंकर परिस्थिती येथे अनुभवास मिळत आहे. तर रात्री संपूर्ण परिसर अंधारात असताना लगतच्या डोंगरदर्‍यातून बिबट्यांच्या डरकाळ्या गावकऱ्यांची झोप उडवत आहे. भीतीमुळे अनेक नागरिक रात्र जागून काढत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून एकलहरे केंद्रातील ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यामुळे लोहशिंगवे व वंजारवाडी ग्रामस्थांना चोवीस तासांपैकी फक्त दोन तास वीजपुरवठा होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. गाव टेकडीवर असल्यामुळे जवळ दुसरी विहीर नसल्याने पाण्यासाठी महिलांना बादलीने विहिरीतून पाणी उपसावे लागत आहे. लगतच्या लहवित गावाला रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने आमच्यावरच अन्याय का? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य युवराज जुन्द्रे यांनी केला आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. अन्यथा भगूर सबस्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

नाशिक व इगतपुरी तालुक्यांच्या सीमेवरील ही गावे असून, गावात पाण्याचा दुष्काळ नाही. मात्र, विजेचा दुष्काळ आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याची भीती, तर दिवसा पाणी मिळेल की नाही याची भीती, अशा दुहेरी संकटात हा परिसर सापडला आहे. – युवराज जुंद्रे, ग्रामस्थ.

हेही वाचा:

जुनैद खानचा महाराज चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी
शालेय विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका!; मध्यान्ह भोजनात मिळणार चटपटीत पदार्थ