Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आज (दि.१३) पेमा खांडू यांनी शपथ घेतली. त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांनी दिली. पेमा खांडू हे सलग तिसर्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, चौना में यांनी अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधी साेहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, किरेन रिजिजू आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेमा खांडू यांची बुधवारी ( दि.१२जून) भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकुण ६० जागांपैकी ४६ जागांवर विजय मिळाला आहे. खांडू हे सलग तिसर्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत.
#WATCH | Pema Khandu takes oath as the Chief Minister of Arunachal Pradesh. pic.twitter.com/413tSLcgrY
— ANI (@ANI) June 13, 2024
#WATCH | Union Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, Union Ministers JP Nadda, Kiren Rijiju and Assam CM Himanta Biswa Sarma attend the swearing-in of Arunachal Pradesh CM-designate Pema Khandu. pic.twitter.com/MViCmJhVIs
— ANI (@ANI) June 13, 2024
कोण आहेत पेमा खांडू ?
अरुणाचल प्रदेश राज्यातील भाजपचा चेहरा अशी ४४ वर्षीय पेमा खांडू यांची ओळख आहे. दिल्लीतील हिंदू विद्यालयात
त्यांनी पदवी घेतली. २००५ मध्ये अरुणाचल प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा केला. २०१० मध्ये ते तवंग जिल्हा काँग्रस समितीचे अध्यक्ष झाले. त्याचे वडील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. पेमा खांडू २०१६ मध्ये मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. १६ जुलै २०१६ राजी त्यांची काँग्रेस विधानसभा पक्ष नेता म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या नबाम तुकी यांच्या सरकारमध्ये ते जल संसाधन व पर्यटन मंत्री होते.
सलग तिसर्यांदा भूषवले मुख्यमंत्रीपद
१६ सप्टेंबर २०१६ रोजी खांडूच्या नेत्तृत्त्वाखाली काँग्रेसच्या ४३ विधान सभा सदस्यांने पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे सदस्यत्व स्वीकारले. खांडू यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी आपल्या गटासह भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. खांडू यांनी मुख्यमंत्रीपद कायम ठेवले. नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक भाजपने खांडू यांच्या नेतृत्त्वाखालीच लढली. भाजपला एकुण ६० जागांर्पैकी ४६ जागांवर विजय मिळाला आहे. खांडू हे सलग तिसर्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत.