दै. ‘Bharat Live News Media’च्या वृत्तानंतर जिल्हा प्रशासनाला जाग; अखेर संकेतस्थळ अपडेट
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – जिल्हा प्रशासनाला त्यांचे संकेतस्थळ अपडेट करण्यासाठी अखेर वेळ मिळाला आहे. दै. ‘Bharat Live News Media’ने बुधवारी (दि. १२) याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानूसार नव नर्वाचित खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह सनदी अधिकाऱ्यांची नावे संकेतस्थळावर अपलोड केली गेली.
अठराव्या लोकसभेच्या निवडणूकांची धामधूम संपली असून केंद्रीय मंत्रीमंडळाने कामालाही प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघात अनुक्रमे वाजे व भगरे यांनी विजय संपादन केला. धूळे-मालेगावमधून डॉ. शोभा बच्छाव यांनी बाजी मारली. या तीन्ही नूतन खासदारांनी दिल्ली मध्ये जाऊन संसदेत नोंदणीबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या सर्वाेच्च संस्थेत नव्या खासदारांनी नोंदणी झाली असताना जिल्हा प्रशासनाची उदासीनता प्रकर्षाने पुढे आली. याबाबत दै. ‘Bharat Live News Media’ने ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर पवार, गोडसे खासदार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली.
लोकसभेचा निकाल जाहिर हाेऊन आठवड्याभराचा कालावधी पूर्ण झाला. मात्र जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे व सुभाष भामरे यांची नावे खासदार म्हणून कायम होती. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचेही नाव जैसे-थे होते. यासर्वांवर कडी म्हणजे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेदेखील बदलली गेली नव्हती. त्यामुळे संकेतस्थळावरील जुने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या नामोल्लेखामुळे सामान्य जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत होता.
हेही वाचा:
भयंकर..!आईस्क्रीम कोनमध्ये सापडले मानवाचे बोट, महिलेची पोलिसात धाव
“माझा ट्रॅक्टरचे पैसे वसुल झाले”: पाकिस्तानचा फॅन सूर्यकुमारच्या खेळीवर खूष!