बीड : प्रशासनाच्या आश्वासनानंतर केज बंदचा निर्णय मागे

गौतम बचुटे; केज : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी केजमध्ये आज (दि.१३) पुकारलेला बंद पोलीस प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने मागे घेतला आहे. त्यामुळे आज केज शहर व तालुक्यातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर काही समाजकंटक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून बदनामी …

बीड : प्रशासनाच्या आश्वासनानंतर केज बंदचा निर्णय मागे

गौतम बचुटे; केज : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी केजमध्ये आज (दि.१३) पुकारलेला बंद पोलीस प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने मागे घेतला आहे. त्यामुळे आज केज शहर व तालुक्यातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर काही समाजकंटक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून बदनामी करीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकार बंद व्हावेत आणि गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सकल ओबीसी आणि बहुजन समाजाच्या वतीने केज शहर आणि तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून बंदचा सार्वजनिक जनजीवनावर परिणाम होवू नये, म्हणून माजी समाजकल्याण सभापती संतोष हंगे, जेष्ठ नेते रमाकांत मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, भाजपच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर, सुनील घोळवे, रिपाइं (ए) तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रिपाइंचे सरचिटणीस गौतम बचुटे, माजी सभापती लाड, ॲड. दीपक मुंडे, भाजपचे सुनिल गलांडे, माजी उपसभापती सुरेंद्र तपसे काका, दादासाहेब ससाणे, रिपाइंचे दिलीप बनसोडे, अक्षय गित्ते, महादेव जाधवर, प्रकाश मुंडे यांच्याशी शांतता समितीच्या बैठकीत चर्चा केली. तसेच अशा समाजकंटकांविरूद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर बंदचा निर्णय मागे घेतल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा : 

आईस्‍क्रीम कोनमध्‍ये सापडले मानवाचे बोट, महिलेची पोलिसात धाव
60 गावे अंधारात, पाणीपुरवठा खंडीत; सिन्नरचे उद्योग अडचणीत
देवळा येथे 16 तासानंतर विजपुरवठा सुरु; बिघाड शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक