पोर्शे अपघात प्रकरण :अनिल देशमुखांचे सरकारवर गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पुणे येथे झालेला पाेर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचण्यासाठी प्रयत्न राज्‍य सरकार करत आहे, असा आराेप शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (Porsche accident case) काय म्हणाले अनिल देशमुख? पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न अपघातातील मृतांच्या चुकीने अपघात झाला …

पोर्शे अपघात प्रकरण :अनिल देशमुखांचे सरकारवर गंभीर आरोप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  पुणे येथे झालेला पाेर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचण्यासाठी प्रयत्न राज्‍य सरकार करत आहे, असा आराेप शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (Porsche accident case)
काय म्हणाले अनिल देशमुख?

पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न
अपघातातील मृतांच्या चुकीने अपघात झाला हे सिद्ध करायचे आहे
विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु

अपघातातील मृतांच्‍या व्‍हिसेरा रिपोर्टमध्‍ये बदलाची तयारी
पुणे अपघात प्रकरणासंदर्भात अनिल देशमुख यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर ट्वीट करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ” पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, अपघातात मृत्‍यू झालेले तरुण आणि तरुणीच्‍या व्‍हिसेरा रिपोर्टमध्‍ये  Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण आणि तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत.” ( Porsche accident case )

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण

मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कार चालवत रविवारी (दि.१९ ) पुण्यातील दाेन आयटी इंजिनिअरला चिरडले. अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया असे मृत तरुण-तरुणीचे नाव आहे. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते.

पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 13, 2024

हेही वाचा 

Pune Porsche Accident | दिवट्याचा मुक्काम बाळसुधारगृहातच!
pune porsche accident : अपघातादिवशी मद्य प्यायल्याची अल्पवयीन मुलाची कबुली
Pune Porsche Accident | डॉ. तावरे अन् अगरवाल दाम्पत्यांना संपर्कात आणणार्‍या मध्यस्थाचा शोध
pune porsche accident : आरोपींची रक्त तपासणी होणार ‘इन कॅमेरा’