‘मविआ’मध्ये समेट, महायुतीत बेबनाव; माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने नाशिकमधील उमेदवाराची माघारी करून घेत शिवसेनेला चाल दिली. मात्र, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दोन्ही उमेदवार मैदानात ठेवले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर …
‘मविआ’मध्ये समेट, महायुतीत बेबनाव; माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने नाशिकमधील उमेदवाराची माघारी करून घेत शिवसेनेला चाल दिली. मात्र, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दोन्ही उमेदवार मैदानात ठेवले आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन अनेक अर्ज बुधवारी (दि.१२) माघारी झाले. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उबाठा गटाने नाशिक आणि कोकणबाबत चर्चा करत प्रश्न सोडवला. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची मुदत ७ जून होती. तर सोमवारी (दि.१०) अर्ज छाननी झाली. त्यात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. बुधवारी (दि.१२) झालेल्या प्रमुख माघारीमध्ये काँग्रेसचे दिलीप पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, धुळे शिक्षक लोकशाही आघाडीचे सदस्य तसेच भाजपचे पदाधिकारी निशांत रंधे, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष सुनील पंडित, रयत सेवा शिक्षक आघाडीचे राज्य अध्यक्ष बाबासाहेब गांगर्डे यांच्यासह १५ उमेदवारांचा समावेश आहे.
तिरंगी लढतीची शक्यता
अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार पाटील, अपक्ष उमेदवार डॉ. विखे यांनी माघारी घेतली असल्याने आता ही लढत प्रामुख्याने विद्यमान आमदार किशोर दराडे, मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे आणि कोपरगावचे संजीवनी संस्थेचे विवेक कोल्हे यांच्यात होण्याची शक्यता आहे.
थेट उद्धव ठाकरेंना फोन
उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी काँग्रेसचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या उमेदवारी अर्ज माघारीनंतर तेथूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पाटील यांच्यासोबत ठाकरे यांनी चर्चा केली. त्यामध्ये आदेश पाळल्याबद्दल भविष्यात तुमचा विचार केला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
नेत्यांनी कार्यालय गजबजले
मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांची चर्चा झाली. चर्चेअंती नाशिक आणि कोकणच्या उमेदवाराबाबत तोडगा निघाला. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराची माघारी करून घेण्यासाठी जिल्हाप्रमुख बडगुजर, विलास शिंदे, उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात जमा झाले. डी. बी. पाटील यांच्यासमवेत यावेळी धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.
विखेंच्या अर्जाबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स
प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील हे शहरातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. मात्र, माघारीसाठी ते केव्हा येतील याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चेचा विषय झाला होता. अडीच पावणेतीन झाले तरीदेखील ते उपस्थित झाले नव्हते. मात्र, त्यांचे सूचक विजय खर्डे यांनी माघारी घेतली असल्याचे अखेरच्या क्षणी जाहीर केले.
तीन कोल्हे, तीन गुळवेंमुळे निवडणूक चर्चेत
नामसाधर्म्य असल्याने लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली होती. शिक्षक निवडणुकीमध्येदेखील नामसाधर्म्याचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गु‌ळवे, अपक्ष उमेदवार संदीप गुरुळे आणि संदीप गुळवे पाटील, तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, सागर कोल्हे आणि संदीप कोल्हे यांचा समावेश आहे.
हेही वाचा:

Nashik News | विधानसभेची तयारी : मनसेचा नाशिक पूर्व मतदारसंघावर दावा
Nashik Eklahare | महावितरणच्या तीन विद्युत उपकेंद्रांचा पुरवठा सुरळीत