सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचे आहे : शरद पवार
इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी करताच यावर, सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचे आहे, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांना विनंती करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सांगू. वेळप्रसंगी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, त्याचीही तयारी ठेवा, असे आवाहनही पवार यांनी केले. शरद पवारांनी बुधवारी तालुक्यातील निरा खोऱ्यातील निरवांगी, खोरोची आणि बोराटवाडी या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी निरवांगी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. दूध दराच्या प्रश्नावरही शरद पवारांनी भाष्य केले.
हेही वाचा :
प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याएवढे सोपे नाही; जयंत पाटील समर्थकाचा रोहित पवारांवर निशाणा
ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन ‘सगेसोयरे’ अधिसूचना काढणार; फडणवीस यांची ग्वाही